तीन वेळा ऑस्कर नामांकित आणि एमी पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेत्री पाईपर लॉरी यांचे अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या निधनाने हॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Hollywood Actress Piper Laurie Passed Away)
अमेरिकेतील मीडिया आउटलेट डेडलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, पाईपर लॉरी यांचे शनिवारी (१४ ऑक्टोबर) वयाच्या ९१ व्या वर्षी लॉस एंजेलिसमध्ये निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. हॉलिवूडमधील एकेकाळातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्या गणल्या जात होत्या. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर त्यांचे मॅनेजर रोसेनबर्ग यांनी त्यांच्या निधनाची माहिती देताना सांगितले की, “पाईपर लॉरी या आमच्या पिढीतील एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व एक चांगली व्यक्ती म्हणून कायम स्मरणात राहतील.”
हे देखील वाचा – लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची भूमिका साकारणार प्रसाद ओक, अमृता खानविलकरही मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा पहिलं पोस्टर प्रदर्शित
PIPER LAURIE has passed away. We lose one of the great artists of the Golden Age of Hollywood, a wonderful woman. Rest in peace. pic.twitter.com/AVi2mk1EN9
— Black Lodge Cult (@BlackLCult) October 14, 2023
पाईपर लॉरी यांना तब्बल नऊ वेळा एमी पुरस्कार आणि तीन वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ‘ट्विन पीक्स’ या लोकप्रिय शोमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना ओळखल्या जात होत्या. त्यांना याच शोमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी १९९० आणि १९९१ मध्ये एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
वयाच्या १८ व्या वर्षी युनिव्हर्सल स्टुडिओ मधून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली असून रोनाल्ड रीगन, रॉक हडसन, टोनी कर्टिस आणि न्यूमन अशा लोकप्रिय कलाकारांसह त्यांनी काम केलेलं आहेत. २०१८ मध्ये आलेल्या ‘व्हाइट बॉय रिक’ चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. त्यांच्या निधनाने हॉलिवूडसह त्यांचा मित्र परिवारावर शोककळा पसरली असून अनेक कलाकार विविध माध्यमांद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहे.