Oscar 2025 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या वाईट घटनेनंतर हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार की नाही याची साऱ्यांना रुखरुख लागून राहिली होती. मात्र या कठीण प्रसंगाला तोंड देऊनही जगभरातील हा नामवंत पुरस्कार सोहळा संपन्न होणार असल्याचं समोर आलं. ऑस्कर २०२५ हा पुरस्कार सोहळा २ मार्च २०२५ रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये ९७वा अकादमी पुरस्कार म्हणून संपन्न झाला. यावेळी चित्रपटांचा सर्वात मोठा पुरस्कार शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रसिद्ध कॉमेडियन आणि पॉडकास्ट कॉनन ओब्रेऑन याने केले. हा पुरस्कार शो काही तास चालला होता, यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ते बेस्ट डायरेक्टर अँड फिल्म्स अवॉर्ड्स जाहीर झाला असून, जो अत्यंत धक्कादायक होता.
या वर्षी, कोणत्याही भारतीय चित्रपटाला पुरस्कारासाठी नामांकन मिळालं नव्हतं. गुनीत मोंगा व प्रियांका चोप्राची सह-निर्मिती असलेल्या अनुजाला सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्ममध्ये फायनल नॉमिनेशन मिळाले होते, पण या शॉर्ट फिल्मचा प्रवास ऑस्कर पर्यंत पोहचू शकला नाही. चला तर मग जाणून घेऊया ऑस्कर सोहळ्यातील विजेत्यांची यादी…
आणखी वाचा – शिवशाहीत ‘ती’ फसली, अत्याचार सहन करुनही दोष तिलाच का? | Pune Rape Case
सर्वोत्कृष्ट चित्रपट : अनोरा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिकी मॅडिसन
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सीन बेकर
सर्वोत्कृष्ट अभिनेता : ॲड्रियन ब्रॉडी
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : लोल क्रॉली
सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म : I’m NOT A ROBOT
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स : DUNE: 2
बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म : नो अदर लँड
बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म : द गर्ल इन द ऑर्केस्ट्रा
बेस्ट ओरिजनल साँग : क्लेमेंट ड्युकोल, कॅमिल आणि जॅक ऑडियर्ड
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : झो साल्दाना
बेस्ट फिल्म एडिटिंग : सीन बेकर
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअर स्टायलिंग : THE SUBSTANCE
बेस्ट अडॅप्टेड स्क्रीनप्ले : पीटर स्ट्रगनला
बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : शॉन बेकर
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन : पॉल टेझवेल
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म : शिरीन सोहनी आणि होसेन मोलायेमी
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म : FLOW
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : कियरन कल्किन