चित्रपट जगतातील अत्यंत मानाचा व प्रतिष्ठित समजला जाणार पुरस्कार म्हणजे ऑस्कर. यंदाच्या अकादमी पुरस्कारांची घोषणा सुरु झाली आहे. ११ मार्च २०२४ रोजी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या पुरस्कारांची घोषणा सुरु झाली आहे. ऑस्कर २०२४ साठीची नामांकनं आधीच जाहीर झाली होती. यामध्ये भारतातील एका छोट्या गावावर बनलेल्या ‘टू किल अ टायगर’ चित्रपटाच्या नावाचाही समावेश आहे. हा चित्रपट कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या दिग्दर्शिका निशा पाहुजा यांनी बनवला आहे. निशा पाहुजाचा जन्म दिल्लीत झाला. ‘टू किल अ टायगर’ चित्रपटाची कथा भारतातील एका छोट्या गावावर आधारित आहे.
यावर्षी ‘बार्बी’, ‘ओपनहायमर’, ‘किलर ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटांची चर्चा होती. पण अखेर ‘ओपनहायमर’ने बाजी मारली. या सोहळ्यात ‘ओपनहायमर’नेच ऑस्कर पुरस्कारांचं खातं उघडलं. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला सर्वाधिक १३ नामांकनं मिळाली होती. त्यापैकी ७ पुरस्कार या चित्रपटाने आपल्या नावे केली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने पटकावला आहे. ख्रिस्तोफर नोलनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नोलानलादेखील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. चला जाणून घेऊयात ऑस्कर विजेत्यांची संपूर्णं यादी.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एमा स्टोनला मिळाला. ‘पूअर थिंग्ज’मधील तिच्या अभिनयासाठी ३५ वर्षीय अभिनेत्रीने ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.
And the Oscar for Best Actress goes to… Emma Stone! #Oscars pic.twitter.com/IbKHKWSiby
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपेनहायमर’ हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे.
To close out the night, the Academy Award for Best Picture goes to… 'Oppenheimer'! #Oscars pic.twitter.com/nLWam9DWvP
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
ख्रिस्तोफर नोलनने ‘ओपेनहायमर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.
Congratulations on your win for Best Directing, Christopher Nolan! #Oscars pic.twitter.com/sVsU31eYir
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
सिलियन मर्फीने ‘ओपेनहाइमर’मधील त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर जिंकला आहे.
Best Actor in a Leading Role goes to Cillian Murphy! #Oscars pic.twitter.com/4BgQJpd6Ou
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
‘बार्बी’ या चित्रपटातील ‘व्हॉट वॉज आय मेड फॉर?’ या गाण्यासाठी बिली इलिशने सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा ऑस्कर जिंकला आहे.
लुडविग गोरानसन यांना ‘ओपेनहायमर’साठी सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअर श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे.
Music to our ears! Ludwig Göransson is the winner of this year's Best Original Score Oscar for 'Oppenheimer'. #Oscars pic.twitter.com/jfi0wswmWM
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
‘द झोन ऑफ इंटरेस्ट’ ने ऑस्कर २०२४ मध्ये आणखी एक पुरस्कार जिंकला. त्याला सर्वोत्कृष्ट साउंडचा पुरस्कार मिळाला आहे.
‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ने सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा ऑस्कर जिंकला आहे.
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर ‘ओपनहायमर’ चित्रपटाला मिळाला आहे.
The Oscar for Best Cinematography goes to… 'Oppenheimer'! #Oscars pic.twitter.com/6Q7qKcbrae
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
२० डेज इन मारियुपोलने या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फील्मचा ऑस्कर जिंकला आहे.
‘सर्वोत्कृष्ट संकलनाचा ‘ओपनहायमर’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलनासाठी ऑस्कर मिळाला आहे.
रॉबर्ट डाउनी ज्युनियरला ‘ओपेनहायमर’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा त्याचा पहिला ऑस्कर पुरस्कार आहे.
‘गॉडझिला मायनस वन’ला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टसाठी ऑस्कर मिळाला आहे.
रॉबर्ट डाउनी ज्युनियरला ‘ओपनहायमर’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
Congratulations to Robert Downey Jr. on winning Best Supporting Actor for 'Oppenheimer'! #Oscars pic.twitter.com/fFrgo9SiEn
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
‘द लास्ट रिपेअर शॉप’ने सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटासाठी ऑस्कर जिंकला आहे.
आणखी वाचा – “सत्याचाच विजय…”, जुई गडकरीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली, “ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत…”
दरम्यान, यंदाच्या ‘ऑस्कर २०२४’ सोहळ्याची दमदार सांगता झाली आहे. दरवर्षी जगभरातील चित्रपटप्रेमी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर हा सोहळा दिमाखात पार पडला असून विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या ९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन चौथ्यांदा जिमी किमेल याने केलं.