शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Oscar 2024 : पुरस्कार सोहळा सुरु असतानाच अचानक जॉन सीना नग्नावस्थेत स्टेजवर पोहोचला अन्…; काय झालं नेमकं? पाहा व्हिडीओ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 11, 2024 | 10:20 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Oscar Awards 2024

Oscar 2024 : पुरस्कार सोहळा सुरु असतानाच अचानक जॉन सीना नग्नावस्थेत स्टेजवर पोहोचला अन्…; काय झालं नेमकं? पाहा व्हिडीओ

Oscar Awards 2024  : जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या अकादमी पुरस्कारांची घोषणा झाली आहे. एकामागून एक अनेक श्रेणींमध्ये ऑस्कर पुरस्कार देण्यात आले आहेत. विजेत्यांव्यतिरिक्त, या अवॉर्ड फंक्शनमध्ये इतरही अनेक खास क्षण आहेत, ज्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. असाच काहीसा प्रकार यंदाच्या ऑस्कर समारंभात घडला जेव्हा अभिनेता जॉन सीना अचानक कपड्यांशिवाय स्टेजवर आला आणि त्याला पाहून सगळेच थक्क झाले. जॉन सीनाने नग्नावस्थेत येण्याचे महत्त्व व्यक्त केले. या अभिनेत्याला होस्ट जिमी किमेलने एका सेगमेंटसाठी स्टेजवर बोलावले होते ज्यामध्ये जॉन सीना नग्न अवस्थेत दिसला.

या सोहळ्यात डब्ल्यूडब्ल्यूईमधील जगप्रसिद्ध रेसलर जॉन सीनाने हजेरी लावली, सध्या त्याच्या एंट्रीची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. जॉन सीना नग्नावस्थेत स्टेजवर आला आणि त्याने किमेलला सांगितले की, तो शेवटच्या क्षणी या भागाला पुढे जाऊ देणार नाही, हे बोलणे ऐकून प्रेक्षकांमधून हशा पिकला. जॉन हळूच लाजत स्टेजवर येतो आणि येऊन माइकजवळ उभा राहतो. जॉन सीनाने किमेलला सांगितले की, “पुरुष शरीर हा विनोद नाही. ते माझे आहे”.

आणखी वाचा – Oscar 2024 : ऑस्करमध्ये ‘ओपेनहायमर’ने मारली बाजी, कोण ठरलं सर्वोत्कृष्ट अभिनेता व दिग्दर्शक, वाचा संपूर्ण यादी

John Cena walks onto the #Oscars stage. https://t.co/UNgGySGz3r pic.twitter.com/zPrsl5oiCy

— Variety (@Variety) March 11, 2024

जॉन सीना एक मोठा लिफाफा घेऊन आपलं शरीर लपवत ऑस्कर २०२४च्या मंचावर हळू हळू चालत गेला. त्या दरम्यान त्याला थोड्या अडचणीचा सामना करावा लागला. त्याला लिफाफा उघडता आला नाही. जॉन सीना म्हणाला, “वेशभूषा खूप महत्त्वाची आहे. कदाचित सर्वात महत्वाची गोष्ट”. जॉन सीना खरंतर सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठीचे नामांकन जाहीर करण्यासाठी आला होता. त्यानंतर काही लोक येऊन त्यांला कापडाने झाकतात. जॉनचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस असणार खास, तर ‘या’ राशीच्या लोकांची होणार प्रगती, जाणून घ्या

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘पुअर थिंग्ज’ला सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनचा ऑस्कर मिळाला. हेअर आणि मेकअप, प्रोडक्शन डिझाइन व कॉस्च्युमसाठी लागोपाठ दोन विजयांसह हा चित्रपट पहिला मल्टिपल ऑस्कर विजेता ठरला. तीन विजयांनी यॉर्गोस लॅन्थिमोसच्या चित्रपटासाठी ही खूप मोठी पोचपावती ठरली.

Tags: entertainmentjohn cena at oscarsoscar awardsoscar awards 2024oscar awards news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Oscars 2024 art designer nitin chandrakant desai remembered during moving in memoriam segment

यंदाच्या ऑस्कर २०२४ सोहळ्यात नितीन चंद्रकांत देसाईंना आदरांजली अर्पण, उपस्थित मान्यवर व कलाकारही भावुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.