बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यांच्या या घटस्फोटाचे वृत्त खोटे निघावे, अशी त्यांच्या चाहत्यांची खूप इच्छा आहे. मात्र, सोशल मीडियावर सतत काही ना काही येत राहते, त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत येते. ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दुरावलेल्या नात्यामुळे चर्चेत आहेत. तसंच सून ऐश्वर्याने बच्चन कुटुंबापासून दुरावल्याचेही बोलले जात आहे. अर्थात यावर ऐश्वर्या राय किंवा बच्चन कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. (Aishwarya Rai Controversies)
आत्तापर्यंत ऐश्वर्याचे नाव अनेक वादात अडकले आहे. ज्यामुळे जया बच्चन आणि श्वेता बच्चन ऐश्वर्या रायपासून दुरावले असल्याचे बोलले जात आहे. चला जाणून घेऊ ऐश्वर्या राय संबंधित असे काही वाद. यापैकी मोठा वाद म्हणजे ऐश्वर्या राय व सलमान खानचे नाते. ऐश्वर्या व सलमान खान यांच्या प्रेमकहाणीची बरीच चर्चा झाली होती. त्यांचे प्रेम फुलले पण ब्रेकअप खूप वेदनादायक होते. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने सलमान खानवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. हा वाद बराच काळ सुरू होता.
यानंतर दुसरे कारण म्हणजे ऐश्वर्याचे नाव सुभाष घई यांच्याबरोबर जोडले गेले होते. लेखिका रीना गोलन यांनी डियर मिस्टर बॉलीवूड नावाचे पुस्तक लिहिले होते, ज्यामध्ये तिने ऐश्वर्याबद्दल एक वादग्रस्त गोष्ट बोलली होती. रीना गोलनने तिच्या पुस्तकात लिहिले होते की, ऐश्वर्याने ‘ताल’ चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळवण्यासाठी सुभाष घई यांच्याशी संबंध निर्माण केले होते आणि हा किस्सा सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता.
तिसरे कारण म्हणजे हृतिक रोशन-ऐश्वर्याचा किसिंग सीन, ऐश्वर्या रायने ‘धूम-२’ चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनबरोबर लीप-लॉक सीन केले होते. चित्रपटातील या किसिंग सीनवर ऐश्वर्याच्या सासरच्या मंडळींनी अर्थात बच्चन कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते. तसंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दृश्य पाहून ऐश्वर्याच्या सासू म्हणजेच जया बच्चन खूप संतापल्या होत्या.
आणखी वाचा – पुरस्कार स्वीकारताना अंकुश चौधरीला अतुल परचुरेंची आठवण, पाणावले डोळे, म्हणाला, “त्याची खूप आठवण येतेय कारण…”
त्यानंतर चौथे कारण म्हणजे ऐश्वर्याने ‘ए दिल है मुश्किल’मध्ये रणबीरबरोबर केलेले काही इंटिमेट सीन्स. अभिषेक बच्चनबरोबर लग्न केल्यानंतर ऐश्वर्याने ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात ती रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माबरोबर दिसली होती. या चित्रपटात ऐश्वर्याने रणबीर कपूरबरोबर अनेक इंटिमेट सीन्स दिले होते, जे पाहूनही जया बच्चन खूप संतापल्या होत्या.
आणखी वाचा – Bigg Boss 18 : दुसऱ्या आठवड्यात ‘बिग बॉस’मधून ‘हा’ सदस्य घराबाहेर?, सलमान खान चांगलीच शाळा घेणार
ऐश्वर्यासंबंधित वादाचे पाचवे कारण म्हणजे ऐश्वर्याचे सलमानबरोबरचे नाते. सलमान खानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याचे नाव अभिनेता विवेक ओबेरॉयबरोबर जोडले जाऊ लागले. या प्रकरणावरुन विवेकवर सलमानने हल्लाबोल केला होता. ऐश्वर्यामुळेच विवेक ओबेरॉय व सलमान खान यांच्यात वैर निर्माण झाल्याचे बोलले जाते. यामुळे विवेक ओबेरॉयचे करिअरही उद्ध्वस्त झाले.