टीव्हीवरील वादग्रस्त व लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस’ हा शो ओळखला जातो. नुकताच ‘बिग बॉस १८’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बिग बॉस १८’ सुरु होऊन आता दोन आठवडे पूर्ण झाले असून या घरातील पहिले अधिकृत एलिमिनेशनही पार पडले आहे. दुसऱ्या आठवड्यात, ‘बिग बॉस १८’च्या घरातील एकूण १० स्पर्धक एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले आहेत. गुणरत्न सदावर्ते घराबाहेर पडल्यानंतर आता आणखी एका स्पर्धकाला ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर पडावं लागणार आहे. दरम्यान, या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणाऱ्या सदस्याच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. मीडिया रिपोर्टमध्ये, या आठवड्यात घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. (Bigg Boss 18 Hema Sharma)
‘बिग बॉस १८’ मध्ये या आठवड्यात एकूण १० सदस्य नामांकन नॉमिनेट झाले होते, ज्यात एलिस कौशिक आणि अविनाश मिश्रा व्यतिरिक्त रजत दलाल, तजिंदर बग्गा, श्रुतिका अर्जुन, हेमा शर्मा, शिल्पा शिरोडकर, चाहत पंजे, करणवीर मेहरा आणि मुस्कान बामणे यांचा समावेश आहे. होते. अशातच आता कुटुंबातील सर्व सदस्य चांगलेच वावरताना दिसले. पण यापैकी एकाला या घरातून निरोप घ्यावा लागणार आहे. या आठवड्यात कंटेंट क्रिएटर हेमा शर्मा उर्फ ’व्हायरल भाभी’ ‘बिग बॉस १८’ या शोमधून बाहेर पडल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा – पुरस्कार स्वीकारताना अंकुश चौधरीला अतुल परचुरेंची आठवण, पाणावले डोळे, म्हणाला, “त्याची खूप आठवण येतेय कारण…”
हेमा शर्माने ‘बिग बॉस १८’चे सुरुवातीचे काही दिवस सहकारी स्पर्धक तजिंदर सिंह बग्गाबरोबर तुरुंगात घालवले. त्यानंतर, प्रेक्षकांना तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अधिक जाणून घेण्याआधीच तिला रिॲलिटी शोमधून बाहेर काढण्यात आल्याची चर्चा सध्या रंगली आहे. आता या चर्चा कितपत खऱ्या आहेत हे आजच्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या आजच्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये सलमान खान सर्व स्पर्धकांची शाळा घेताना दिसून येईल.
सलमान खानने ‘बिग बॉस १८’चं शूटिंग पुन्हा सुरू केलं आहे. बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान सलमान खान ‘बिग बॉस’ शोच्या शूटींगसाठी परतला आहे. सलमानने ‘बिग बॉस १८’ च्या ‘वीकेण्ड का वार’ भागासाठी कडक सुरक्षा बंदोस्त आणि ६० सुरक्षा रक्षकांसह शूटिंग केल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानचा ‘वीकेण्ड का वार’ भागाचा प्रोमो प्रदर्शि करण्यात आला आहे.