शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऑरीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात वर्णी, साकारणार ‘ही’ महत्त्वपूर्ण भूमिका

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 24, 2024 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Orry aka orhan awatramani Bollywood debut with Sanjay Leela Bhansali in Love and War movie

ऑरीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात वर्णी

काही माहिन्यांपूर्वी सर्वांसमोर सातत्याने येणारं नाव म्हणजे ‘ऑरी’. ऑरी हा बॉलिवूडमधील प्रत्येक पार्टीमध्ये प्रत्येक कलाकाराबरोबर दिसून येतो. अंबानींच्या लग्नापासून ते अगदी अगदी कोणत्याही चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ऑरी हमखास असतो. त्याचं आणि स्टारकिड्सच तर अनोखं नातं आहे. प्रत्येक स्टारकिड्सबरोर ऑरी हा असतोच असतो. सातत्याने चर्चेत राहणारा हा ऑरी आता लवकरच चित्रपटातही झळकणार आहे. तो हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. तेही संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातून. यात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Orry Bollywood Debut)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ऑरी आता ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात दिसणार आहे. पण त्याला पाहुणा कालकार म्हणून कास्ट करण्यात आले असल्याचे म्हटलं जात आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोणदेखील या चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात ऑरी होमोसेक्श्युअल व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. ऑरी या चित्रपटात आलियाच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. आलिया भट्ट या चित्रपटात एका डान्सरच्या रोलमध्ये दिसेल. तर रणबीर कपूर आणि विकी कौशल हे आर्मी ऑफिसरची भूमिका निभावणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry)

आणखी वाचा – Video : ‘सातव्या मुलीची…’च्या शेवटच्या दिवशी ऐश्वर्या नारकरांसह इतर कलाकार ढसाढसा रडले अन्…; सगळ्यात भावुक व्हिडीओ व्हायरल

भन्साळींचा हा चित्रपट मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ऑरी हा इंटरनेट सेन्सेशन म्हणून ओळखला जातो. सोशल मीडियावर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे १.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तो त्याच्या चाहत्यांसाठी बॉलीवूड पार्टीचे अनेक इनसाइड फोटोज शेअर करतो. तो प्रत्येक मोठ्या गायकाच्या मैफिलींनाही हजेरी लावतो आणि अनेक वेळा विचित्र पोशाख घालून पापाराझींसमोर हजर असतो.

आणखी वाचा – प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

दरम्यान, रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांच्या या चित्रपटात सोशल मीडिया सेन्सेशन ऑरीचीही एन्ट्री झाली आहे. त्यामुळे भन्साळींच्या चित्रपटात ऑरी झळकणार, हे समजल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ऑरीचे चाहते त्याला अभिनय करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे

Tags: Orry Bollywood DebutOrry Bollywood debut Love and War movieOrry Bollywood debut with Sanjay Leela Bhansali
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
mika singh on rakhi sawant kiss in incedence

राखी सावंतला किस करण्यावरुन मोठा वाद, प्रकरण कसं संपलं?, मिका सिंह म्हणाला, "तिनेही गालावर किस करत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.