एक काळ असा होता जिथं माणसं खेडेगावातून शहरात पैसे कमवण्यासाठी यायची पण मन मात्र गावाच्या अंगणातच ठेऊन यायची केवळ गरजेपोटी घर सोडणारी मंडळी मनाने कधीच शहराची झाली नाहीत. तर काहींनी गाव आणि शहर या मध्ये भेदभाव न मानता दोन्हीचं महत्व कमी होऊ न देता ते जपलं. मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकार मंडळीसुद्धा खेडेगावातून येऊन आज यशाच्या शिखरावर आहेत पण तरीही त्यांची नाळ गावाकडच्या आठवणींशी जोडली गेली आहे.(kailash waghmare struggle)
असाच एक कलाकार म्हणजे अभिनेता कैलाश वाघमारे. मनातल्या उन्हात या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आलेल्या कैलाश ने पुढे तान्हाजी द अंसंग वॉरियर, भिरकीट अशा अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. तर नुकताच त्याची प्रमुख भूमिका असणारा ‘घोडा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपट संदर्भात इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखताती कैलाश ने गावाकडची त्याच्या लहानपणची अशीच एक आठवण शेअर केली आहे.

हल्लीच्या जमान्यात लहान मुलांना आईवडील हवं ते अगदी सहज आणून देत असतात. परंतु काही वर्षांपूर्वी हे एवढं शक्य न्हवतं त्या बद्दलच जेव्हा कैलास ला विचारण्यात आले कि तू कधी आई वडिलांकडे असा हट्ट केला आहे का? तेव्हा कैलाश उत्तरादखल म्हणाला ‘ आमच्या वेळी ते सहज शक्क्य न्हवतं आम्हाला आठवडे बाजारासाठी सुद्दा ५ किलोमीटर लांब जावं लागायचं. घरच्या परिस्थतीपुढे त्याकाळी दुसरं काहीही दिसत न्हवत.
काय घडलेलं लहानपणी(kailash waghmare struggle)
लहानपणीची आठवन सांगताना कैलाश ने लहानपणीची एक आठवण शेअर केली कैलाश म्हणाला ‘गावच्या जत्रेत जाण्यासाठी आईने एकदा मला १० रुपये दिले होते आणि म्हणाली होती जे तुला हवं ते आन. त्यावेळचे १० रुपये म्हणजे आताचे खूप जास्त पैसे झाले. त्यावेळी मी त्या १० रुपयात घरचा बाजार घेऊन आलो आणि ते बघून आई म्हणाली अरे काय हे तुला तुला हवी असणारी गोष्ट आणायला सांगितलेली तू घरचा बाजार घेऊन आलास. कुठे तरी स्वतःच्या आवडीनिवडी पेक्षा तेव्हा घरात कोणत्या वस्तूची गरज आहे त्या वस्तू आपण घेऊयात असे त्यावेळी वाटले.'(kailash waghmare struggle)
====
हे देखील वाचा- ‘दुनिया डोक्यावर घेणार हाय रं….’ ओंकार ने सांगितला व्हायरल गाण्यांमागचा किस्सा
====
कैलाशच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी याराच म्हणजेच त्याच्या लहान लेकीचं आगामी झालं आहे. एकूणच काय तर काही वेळा परिस्थती अशी असते कि जबाबदारी पुढे काहीही दिसत नाही त्याबद्दलचा कैलाशचा हा अनुभव लहानपणी जगलेल्या आयुष्याची आठवण करून देते.