अभिनेता गश्मीर महाजनी हा सध्या विशेष चर्चेत आहे. गश्मीरचे वडील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान त्यांच्या मृत्यूला अनेकांनी गश्मीरला जबाबदार ठरवले आहे. असे असले तरी काहींनी गश्मीरची बाजू सांभाळत त्याला सांभाळून घेतलं आहे. (Gashmeer Mahajani Incident)
रवींद्र महाजनी यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. एक काळ रवींद्र महाजनी यांनी चांगलाच गाजवला होता. देखणे अभिनेते म्हणून रवींद्र महाजनी यांना ओळखलं जायचं. कमालीची लोकप्रियता मिळवलेल्या या अभिनेत्याच्या आयुष्यात आलेल्या वादळांमुळे ते पूर्णतः खचले. बांधकाम क्षेत्रात व्यवसाय सुरु करून त्यांनी भागीदारी केली, आणि त्या व्यवसायात त्यांची खूप मोठी फसवणूक झाली. आणि ते कर्जबाजारी झाले.
पाहा गश्मीरच्या आयुष्याला कलाटणी देणारी ती व्यक्ती कोण आहे (Gashmeer Mahajani Incident)
दरम्यान त्यांच्या घरावर जप्ती आली, त्यावेळी गश्मीर फक्त १५ वर्षांचा होता. अशावेळी गश्मीरने स्वमेहनतीवर स्वतःची डान्स अकॅडमी सुरु केली आणि वयाच्या २१व्या वर्षी स्वबळावर घरावर आलेलं कर्ज फेडलं. या त्याच्या संघर्षाच्या काळात त्याला कुटुंबासोबतच सिनेमाविश्वातल्या एका दिग्गज व्यक्तीची साथ लाभली. ही दिग्गज व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेते प्रवीण तरडे होय. प्रवीण तरडे यांनी गश्मीरच्या जीवनाला टर्निंग पॉईंट मिळवून दिला, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
गश्मीरच्या संघर्षाच्या काळात त्याची ओळख प्रवीण तरडे यांच्याशी झाली. प्रवीण हे एकांकिका लिहायचे, दिग्दर्शन करायचे आणि गश्मीर त्यात ऍक्टिंग करायचा. एकदा प्रवीण यांच्यासोबत बोलताना गश्मीरच्या आईने त्याच्याबद्दल काळजी व्यक्त केली होती. म्हणून प्रवीण यांच्या येण्याने गश्मीरच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, असं गश्मीर बरेचदा म्हणतो.
हे देखील वाचा – ‘बाईपण’ इतकं यश ‘महाराष्ट्र शाहीर’ला मिळालं नाही?केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत
प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटात गश्मीरने महत्वपूर्ण भूमिका साकारली, त्यानंतर गश्मीर प्रवीण यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमात देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला.
रवींद्र महाजनी यांच्या जाण्याने गश्मीर हा बराच ट्रोल झाला असला, तरी गश्मीरची पडत्या काळातली बाजू समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. प्रवीण तरडे यांची गश्मीरला मिळालेली साथ पाहता त्यांच्या विषयीचा आदर हा नक्कीच द्विगुणित होणारा आहे.
