मराठी सिनेविश्वातील लाडकी गायिका आर्या आंबेकर हिने सा रे ग मा पा लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे आर्याला प्रसिद्धी मिळाली. आर्या आता एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. नुकताच मराठमोळ्या लूकमध्ये आर्याने फोटोशूट केला आहे.(Aarya Ambekar New Look)
हे देखील वाचा: अंकिता विकासाच्या नात्याला ५ वर्षे पूर्ण शेअर केला खास व्हिडिओ
आर्याने या फोटोंमध्ये नववारी साडी नेसली आहे. त्यावर साजेसे दागिने परिधान करून, नाकात नथ घातली आहे. अशा पद्धतीचा मराठमोळा साजशृंगार आर्याने केला आहे. तिच्या या फोटोंवर “या नैसर्गिक सौंदर्याला कशाचीच तुलनाच नाही आर्या, तुझ्या या अप्रतिम सौंदर्याचे कौतुक करण्याकरता माझ्याकडील संपुर्ण शंब्दांचा संग्रह सुद्धा कमी पडतो आहे पण तरी सुध्दा आर्या, you are looking so beautiful ” अशा प्रकारच्या भन्नाट कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

परंतु महाराष्ट्राची हास्यजता या कार्यक्रमातील अभिनेता ओंकार राऊत च्या कमेंटने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ओंकारने “स्वाभाविक सहज सौंदर्य” अशी कमेंट आर्याच्या फोटोंवर केली आहे. त्याच्या कमेंटवर आर्याने thank you देखील म्हंटल आहे. ओंकारच्या कमेंटमुळे आर्याचे फोटो आता चर्चेचा विषय बनले आहेत. (Aarya Ambekar New Look)
हे देखील वाचा: सोनालीचा नवा मल्याळम सिनेमा
आर्याने अनेक मालिकांचे शीर्षक गीत गायले आहेत. तिचे तुला पाहते रे या मालिकेचे शीर्षक गीत खूप प्रसिद्ध झाले होते. आता स्टार प्रवाहवर सुरु असलेली मालिका “आई कुठे काय करते” या मालिकेचे सुद्धा शीर्षक गीत तिनेच गायले आहे. तसेच तिने काही चित्रपटात गाणी देखील गायली आहेत.
तसेच तिचे गाण्यांचे गीत संग्रह देखील आहेत. आर्याच्या आवाजाला देवाची एक विशेष देणगी असल्यामुळे तिच्या गाण्याची प्रश्नसा अनेक दिग्गज गायक आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकार करताना दिसतात. नुकताच आलेला चित्रपट “सारला एक कोटी” मध्ये आर्याने “केवढ्याचं पान तू” नावाचं गाणं गायलं होत आणि हे गाणं प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध देखील झाले. तसेच आर्याला तिच्या गायकीची अनेक पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले आहे.