बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा बहुचर्चित ‘OMG 2’ सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने अखेर हिरवा कंदील दिला. मात्र सिनेमामध्ये अनेक बदल करूनही ‘A’ सर्टिफिकेट दिले. शिवाय सिनेमातील अक्षय कुमारने जे पात्र साकारलं आहे, तेही बदलण्याची माहिती बोर्डाने निर्मात्यांना दिली आहे. ‘OMG 2’ हा ‘ओह माय गॉड’ चा सिक्वेल असून येत्या ११ ऑगस्टला देशभरातील सिनेमागृहात रिलीज होणार आहे. (OMG 2 movie)
अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ सिनेमाचं कथानक होबोफोबियावर आधारित आहे. ज्यात कथेतील मुलगा समलैंगिकतेच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या करतो. त्यानंतर शिवभक्त असलेले पंकज त्रिपाठी लोकांना होमोफोबियाबद्दल जागरूक करण्याचा वसा घेतात. शिवाय या सिनेमामध्ये हस्तमैथुनाच्या मुद्द्यावरही भाष्य करण्यात आली आहे. त्यामुळे ते आणि लैंगिक शिक्षण यांचा भगवान शिवशी जोडलेला संबंध यावर प्रेक्षक कसे व्यक्त होतील, याबद्दल बोर्डाचे सदस्य साशंक आहेत. त्यामुळेच बोर्डाने सिनेमाच्या निर्मात्यांना अक्षय कुमारची भूमिका बदलण्याचे सुचवलं आहे.
त्याचबरोबर सिनेमातील काही आक्षेपार्ह दृश्यांमुळे बोर्डाच्या कमिटीने २० कट्स सुचवले. त्यामध्ये बदल करूनही अखेर बोर्डाने अक्षयच्या सिनेमाला ‘A’ सर्टिफिकेट दिलं आहे. याचा अर्थ, अक्षय कुमारचा ‘OMG 2’ सिनेमा केवळ प्रौढांनाच पाहता येणार आहे. (OMG 2 movie)
हे देखील वाचा : शिव ठाकरेसोबत अफेअर असल्याच्या चर्चांवर डेझी शाहने सोडलं मौन, म्हणाली, “आमच्यात मैत्रीहून अधिक ..”
बहुचर्चित ‘OMG 2’ सिनेमात अक्षय कुमारसह पंकज त्रिपाठी, यामी गौतम, अरुण गोविल आदी कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट रोजी सनी देओलच्या ‘गदर २’ सोबत रिलीज होणार आहे. (OMG 2 movie)
