अभिनेता शिव ठाकरे हा बिग बॉस मराठी मुळे चर्चेत आला, मात्र त्यांनतर त्याला विशेष लोकप्रियता मिळाली ती ‘खतरों के खिलाडी’ या रिऍलिटी शो मुळे. ‘खतरों के खिलाडी’ या शो मुळे शिव ठाकरे आणि डेझी शाह विशेष चर्चेत आले. ‘खतरों के खिलाडी’चा स्पर्धक शिव ठाकरे आणि डेझी शाह गेल्या काही काळापासून डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरत आहेत. शो दरम्यान त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे चाहत्यांनी असा अंदाज लावला की शिव आणि डेझी शाह एकमेकांना डेट करत आहेत. (Shiv Thakare and Daisy shah Relationship)
शिवाय, हे दोघे सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट देखील करतात. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर, ते नियमितपणे बाहेर आणि शहरातील कार्यक्रमांमध्ये दिसले. दरम्यान त्यांच्यातील बाँडिंग पाहता चाहते आणि फॉलोअर्समध्ये कुजबुज रंगलेली पाहायला मिळतेय. दरम्यान चाहत्यांच्या या शंकेवर आता डेझी शाहने स्पष्टपणे भाष्य केल्याचं समोर आलं आहे.
पाहा शिवसोबतच्या नात्यावर काय म्हणाली डेझी शाह (Shiv Thakare and Daisy shah Relationship)
शिव ठाकरे आणि डेझी शाह यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चांना उधळून लावत डेझी शाहने ETimes सोबत संवाद साधला. या वेळी बोलताना तिने सांगितलं की, “शिव आणि ती फक्त मित्र आहेत. यापुढे डेझी म्हणाली, “शिव ठाकरे सोबतच्या लिंक-अप अफवांमुळे आमच्या मैत्रीवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करतो कारण जोपर्यंत आम्ही एकमेकांना डेट करत आहोत हे जाहीर करत नाही, तोपर्यंत आम्ही एकमेकांना डेट करत नाही. यापुढे ती म्हणाली आहे की, “तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफबद्दल दुनियेसमोर जितकं न्याल, त्याहून अधिकची माहिती ते कायमच अपेक्षित करतील.”
हे देखील वाचा – लग्नाच्या दोन वर्षांनी सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर देणार गुड न्यूज? नव्या फोटोशूटमुळे चर्चेला उधाण
बर्याचदा अफवा या सेलिब्रिटींवर दबाव आणतात आणि प्रत्येकजण त्या अफवांना हाताळू शकत नसल्याची कित्येक उदाहरणे आहेत जी आजवर आपण पाहिली आहेत. डेटिंगच्या अफवांचा त्यांच्या नातेसंबंधावर परिणाम होतो का याबद्दल बोलताना डेझी शाहने सांगितले की, “या अशा अफवांमुळे आमच्या मैत्रीवर कोणताही परिणाम होत नाही. खरं तर, आम्ही पूर्वीपेक्षा आमच्यातली मैत्री अधिक घट्ट झाली आहे. आमची मैत्री काय आहे हे आम्हाला ते जगासमोर दाखवायला आवडत नाही.”