झी मराठी(zee marathi) वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात नेहमी अग्रेसर असते. स्पर्धेच्या जगात वावरताना सगळ्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग तुम्हाला करावे लागतात. टीआरपी चा मागील काही महिन्यांचा उचांक पाहता झी मराठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन प्रयोग करताना दिसत आहे. नवा गाडी नवं राज्य, दार उघड बये या झी मराठीवरील मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहेत.
हे देखील वाचा – मालिकेच्या कलाकारांसोबतच प्राण्यांना सुद्धा आपुलकीने जपणारा निर्माता..
मालिकांच्या विश्वात अनेक मालिका वेगवेगळे विषय घेऊन येत असतात. काही मालिका इथे जास्त काळ तग धरून राहत नाहीत पण काही विषय असे असतात जे प्रेक्षकांना कधी संपूच नयेत असं वाटतात. एक काळ प्रचंड गाजवलेले असेच विषय घेऊन झी मराठी पुन्हा येत आहे. झी मराठी(zee marathi) वरील “होणार सून मी या घरची”, “का रे दुरावा” या मालिका पुन्हा प्रेक्षेपित करण्याचा निर्णय वाहिनी ने घेतला आहे. या बद्दल अद्याप ऑफिशिअल घोषणा करण्यात आली नाही परंतु मनोरंजन मराठी या इंस्टाग्राम अकाउंट वरून सदर पोस्ट करण्यात आली आहे.
वरील पोस्ट मधील माहिती प्रमाणे १३ फेब्रुवारी २०२३ पासून सायंकाळी ४ वाजता होणार सून मी या घरची तर सायंकाळी ५ वाजता का रे दुरावा या मालिकांचं पुनर्प्रेक्षेपण झी मराठी(zee marathi) वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकांची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत होती. आता प्रेक्षक पुन्हा या मालिका पाहणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

होणार सून मी या घरची या मालिकेत श्री आणि जान्हवी म्हणजे अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली तर या मालिकेतील “काहीही हं श्री” हा डायलॉग प्रचंड प्रसिद्ध देखील झाला होता. दुसरीकडे का रे दुरावा या मालिकेतील आदिती आणि जय या जोडीवर सुद्धा प्रेक्षकांनी प्रेम दर्शवलं होतं. तर मालिकेतील सुबोध भावेंची भूमिका सुद्धा प्रेक्षकांना आवडलेली.