Jui Gadkari : अभिनेत्री जुई गडकरी हिने तिच्या अभिनय कौशल्याने सर्वांचं मन जिंकलं आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील तिच्या सायली या भूमिकेला प्रेक्षक प्रचंड प्रेम देत आहेत. जुई नेहमीच तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे अपडेट्स शेअर करत असते. जुईचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आणि नेहमीच ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आजवर जुईने मालिकाविश्वात सोज्वळ सून, प्रेमळ लेक अशा भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहणारी जुई आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जुईने नुकतीच ‘महाराष्ट्र टाइम्स’ला मुलाखत दिली, यावेळी ती अनेक विषयावर व्यक्त होताना दिसली. या मुलाखतीदरम्यान जुई वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि अभिनयक्षेत्राबद्दल देखील व्यक्त झाली. यावेळी बोलताना तिने बोल्ड कंटेंटमध्ये काम न करण्याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं.
आणखी वाचा – आईच आजारपण, अनेक आठवणी अन्…; साताऱ्यातील ‘पारू’च शूटिंग संपताच प्रसाद झाला शिफ्ट, ते घर सोडताना भावुक
या मुलाखतीमध्ये तिला विचारण्यात आलं की, “काही गोष्टी तुला करायच्या नसतील तर तु काय म्हणशील? आणि ती नेमकी गोष्ट कोणती असेल?”. या प्रश्नावर जुईने उत्तर दिलं की, “मला बोल्ड कंटेंटवर काम करायचं नाही. मी तसे काम करण्यास कम्फर्टेबल नाही आहे. त्यामुळे मी तसे काम करण्यास नकार देते. माझ्या आई-बाबांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात माझा खूप आदर आहे, आणि मला तो आदर कायम तसाच ठेवायचा आहे”.
आणखी वाचा – अखेर हास्यजत्रेत परतला ओंकार भोजने, पहिला प्रोमो समोर, प्रेक्षकही खुश, म्हणाले, “दिवाळीचा बोनस…”
पुढे जुई म्हणाली की, “काहीजण म्हणतात की, कलाकार म्हणून करावं लागतं, तर असं मला अजिबात वाटत नाही. तुम्ही तेच केलं की तुम्हाला वेगळ्या प्रकारचा अभिनय येतो. हे सिद्ध होत नाही. त्यामुळे मी कधीच बोल्ड सीन करण्याचा विचार करणार नाही”. त्यानंतर जुईला विचारण्यात आलं की, “या विचारामुळे चांगले काम हातातून सुटत आहेत, असं तुला वाटत नाही का?”. त्यावर जुई म्हणाली की, “आजपर्यंत मला कधीच असं वाटलं नाही की, माझ्या हातून चांगलं काम गेलं आहे, माझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे येणारंच आहे. त्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे माझ्या हातातून काम निसटतंय, याचं दुःख मला वाटत नाही”. असं स्पष्ट मत जुईने मांडलं.





