शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

डोक्यावर टोपली, काम करुन थकवा अन्…; स्वत:च्या शेतात रमली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, साधेपणाचं कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 14, 2025 | 3:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ashwini mahangade working in farm

ashwini mahangade working in farm : बरीच अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांचा साधेपणा नेहमीच साऱ्यांना भावला आहे. सेटवर भूमिका साकारताना त्यांचं एक वेगळं रुप पाहायला मिळतं. तर घरी कुटुंबासह त्यांची एक वेगळीच बाजू पाहायला मिळते. बरेचदा चाहत्यांना ही कलाकार मंडळी खऱ्या आयुष्यात कसे असतील, कसे राहत असतील याची उत्सुकता असते. अशावेळी ही कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चाहत्यांसह त्यांचे रुटीन, वैयक्तिक अनुभव शेअर करताना दिसतात. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवरुन तिचा साधेपणा दिसून येत आहे.

‘आई कुठे काय करते’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनीने आजवर अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावरही अश्विनी बऱ्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळाली. अशातच अश्विनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती त्यांच्या शेतात राबताना दिसत आहे. यावेळी शेतातून घरी परततानाचे फोटो तिने पोस्ट केले आहेत.

आणखी वाचा – वर्ष झालं! अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण, त्यांच्या आठवणी आजही जिवंत

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

अश्विनी ही मूळची सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आहे. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच ती गावाकडे वाढली आहे. आणि तिला गावची ओढ आहे. गावाकडे लहानपणापासून शेतात जात असल्याने तिला शेतीचीही बऱ्यापैकी माहिती आहे. आणि शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ती अधूनमधून गावाकडे शेतात काम करायलाही जात असते. आताही अश्विनीने “हे फक्त फोटो नाहीत तर यात भावना आहेत”, असं कॅप्शन देत शेतातील खास फोटो पोस्ट केले आहेत.

आणखी वाचा – “बोल्ड कंटेंटसाठी कम्फर्टेबल नाही”, जुई गडकरी स्पष्टच बोलली, म्हणाली, “हातातून काम निसटतंय…”

अश्विनीच्या या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावर तिच्या या साधेपणाचं भरभरुन कौतुकही होत आहे. अनेकांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. “आभाळाला हात टेकून सुद्धा आपल्या काळया आईशी असलेले नाते घट्ट ठेवणारी आमची ताई”, “तुझं खूप कौतुक वाटत ग तायडे… अभिनेत्री म्हणून बाजूला आणि जन्म घेतलेल्या मातीतलं नातं एका बाजूला म्हणजेच साधी सरळ एक मुलगी”, अशा कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

Tags: Ashwini Mahangadeentertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
abhang Tukaram movie

‘अभंग तुकाराम’ चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न, कलाकारही चित्रपटातील लूकमधून थेट मंचावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.