गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर हास्यजत्रेत परतला ओंकार भोजने, पहिला प्रोमो समोर, प्रेक्षकही खुश, म्हणाले, “दिवाळीचा बोनस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 14, 2025 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra Comeback Onkar Bhojane

अखेर हास्यजत्रेत परतला ओंकार भोजने, पहिला प्रोमो समोर, प्रेक्षकही खुश, म्हणाले, "दिवाळीचा बोनस…"

Maharashtrachi Hasyajatra Comeback Onkar Bhojane : संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदाने वेड लावणारा अभिनेता ओंकार भोजने पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर परतला आहे आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ओंकार घराघरात पोहोचला. त्याच ‘अगं अगं आई…’ म्हणणार ओंक्या हे पात्र असो वा ‘हा इथे काय करतोय’ विचारणाऱ्या मामाची भूमिका असो भोजनेने आपल्या विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ओंकारने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

मधल्या काळात त्याने शोमधून ब्रेक घेतला होता, ज्यामुळे त्याचे चाहते काहीसे नाराज झाले होते. सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांनी त्याला महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये परत येण्यासाठी बराच काळ मागणी केली. आणि प्रेक्षकांच्या या मागणीला मान देत ओंकार भोजने पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात परत येत आहे. ओंकारने पुन्हा हास्यजत्रेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीने नवा प्रोमो दाखविला आहे त्यात ओंकारला पुन्हा पाहून प्रेक्षक आनंदी झाले आहेत.

आणखी वाचा – आईच आजारपण, अनेक आठवणी अन्…; साताऱ्यातील ‘पारू’च शूटिंग संपताच प्रसाद झाला शिफ्ट, ते घर सोडताना भावुक

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

प्रोमोमध्ये ओंकारच्या खास शैलीतील मामाचे पात्र साकारले आहे. या पात्राने आणि मामांच्या संवादाने सर्वांचे लक्ष वेधले. ओंकारच्या या घरवापसीमुळे प्रेक्षकांच्या प्रेमाचा आणि कौतुकाचा पाऊस नक्कीच पडणार आहे. हास्यजत्रा हे माझे प्रेम आहे असे ओंकार चे नेहमी म्हणणे आहेच. ओंकारचे परत येणे म्हणजे ‘हास्यजत्रा’च्या विनोदाची पातळी आणखी वाढणार हे निश्चित. महाराष्ट्राची हास्यजत्रा या सीजन मध्ये त्याच पुनरागमन होत आहे म्हणजेच ऐन दिवाळीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा दुप्पट बोनस मिळणार हे नक्की.

आणखी वाचा – Filmfare मिळताच छाया कदम यांच्या डोळ्यात पाणी, मंचावर शाहरुख खानने दिला धीर अन्…; व्हिडीओ व्हायरल

नम्रता संभेराव, समीर चौगुले, नम्रता संभेराव आणि वनिता खरात यांच्यासोबत ओंकारची जुगलबंदी पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. त्यामुळे, प्रेक्षकांची लाडकी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता ओंकार भोजनेच्या दमदार एन्ट्रीने आणखी रंगतदार होणार आहे. सज्ज व्हा, कारण आता हसून हसून पोट दुखायला लावणाऱ्या या ‘कोकण कोहिनूर’ची धमाल पुन्हा सुरु झाली आहे.

Tags: maharashtrachi hasyajatramarathi actoronkar bhojane
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
atul parchure

वर्ष झालं! अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण, त्यांच्या आठवणी आजही जिवंत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.