zee marathi paaru : मराठी मालिकाविश्वात अशा अनेक मालिका आहेत ज्यांचं चित्रीकरण हे मुंबईपासून दूर गावखेड्यात सुरु असलेलं पाहायला मिळालं. लोकेशननुसार मालिकांचं चित्रीकरण होताना पाहायला मिळतं. आणि यामुळेच असे अनेक कलाकार आहेत जे मालिकांच्या चित्रीकरणानिमित्त घरापासून दूर असलेले पाहायला मिळतात. असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर जात शूटिंग करतात. अशातच झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेचं शूटिंग मालिका सुरु झाल्यापासून सातारा येथे सुरु झालं होतं. सातारा जिल्ह्यातील उमरोडी धरणाजवळ असलेल्या दहिवड-आष्टी गावातील आलिशान बंगल्यात हे चित्रीकरण सुरु होतं.
आता मात्र या मालिकेचं शूटिंग मुंबईत सुरु झालं आहे. आणि म्हणूनच सातारामधून मालिकेची संपूर्ण टीम मुंबईला शिफ्ट झाली आहे. आणि मालिकेच्या चित्रीकरणाची जागा बदलताच पारू फेम आदित्य म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेने भाष्य केलं आहे. मालिकेचं चित्रीकरण जेव्हा सातारा येथे सुरु होतं तेव्हा प्रसाद सातारामध्येच राहत होता. आणि त्याचं कुटुंब मुंबई-पुण्यात राहत असल्याने तो अधूनमधून ये जा करायचा. तर बरेचदा त्याचे कुटुंबीयही साताराला यायचे.
आणखी वाचा – Filmfare मिळताच छाया कदम यांच्या डोळ्यात पाणी, मंचावर शाहरुख खानने दिला धीर अन्…; व्हिडीओ व्हायरल
मालिकेचं शूटिंग संपताच प्रसाद जवादे आणि त्याची पत्नी अमृता देशमुखने युट्युब व्हिडीओद्वारे याबाबत भाष्य केलं आहे. प्रसाद गेली दीड वर्ष सातारा येथे फ्लॅटमध्ये राहत होता. याची झलकही अमृताने बऱ्याचदा युट्युब व्हिडीओमधून दिली होती. आता शुटिंग पुन्हा मुंबईत परतताना प्रसादला साताराच घर सोडताना वाईट वाटलं. अमृता म्हणाली, “प्रसाद आणि मी आमचं हे साताऱ्यातील घर सोडून जाणार आहोत. कारण, पारू मालिकेचं शूटिंग आता मुंबईत सुरु होणार आहे. गेली दीड ते दोन वर्षे या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरु होतं. यानिमित्ताने आम्ही सुद्धा साताऱ्यात राहत होतो. या घराने आम्हाला खूप काही दिलं. साताऱ्यात राहून खरंच खूप छान वाटलं”.
आणखी वाचा – सततच्या केसगळतीला त्रासले आहात का?, हे सोप्पे घरगुती उपाय करतील ‘या’ त्रासातून मुक्त, जाणून घ्या…
पुढे प्रसाद जवादे म्हणाला, “माझ्या आईची प्रकृती या साताऱ्याच्या घरात पूर्णपणे बरी झाली. ती आता खूप छान आहे. त्यामुळे या घराबरोबर आमच्या खूप आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत”. सध्या मालिकेत पारू व आदित्य अहिल्यादेवींचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.





