रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नोरा फतेहीचा अपघात, मद्यधुंद चालकाला अटक, आता अभिनेत्रीची प्रकृती कशी? ‘तो’ व्हिडीओ समोर येताच व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 22, 2025 | 3:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nora Fatehi Accident

नोरा फतेहीचा अपघात

Nora Fatehi Accident : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेही शनिवारी मुंबईत एका अपघातात जखमी झाली. पश्चिम उपनगरातील आंबोली परिसरातील लिंक रोडवर हा अपघात घडला असून, नोराच्या कारला एका मद्यधुंद चालकाने जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात नोरा फतेहीला गंभीर दुखापत झाली नसून तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नोरा फतेही एका कार्यक्रमासाठी, म्हणजेच सनबर्न फेस्टिव्हलमध्ये सादरीकरण करण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघात होताच तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं. नंतर डॉक्टरांनी तिची सीटी स्कॅन तपासणी देखील केली, ज्यामध्ये कोणतीही गंभीर अंतर्गत दुखापत नसल्याचं स्पष्ट झालं.

आणखी वाचा – “ओळख करून देण्याची ही कोणती पद्धत?…”, होणाऱ्या सूनेवर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री; कारण…

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi Heart (@nora.fatehi_heart)

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत धडक देणाऱ्या चालकाला ताब्यात घेतलं. सदर चालक हा २७ वर्षीय युवक असून तो अपघाताच्या वेळी मद्याच्या अमलाखाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुंबई पोलिसांनी त्याला अटक करून पोलीस कोठडी सुनावली आहे. अपघातानंतर काही तासांनी नोरा फतेहीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या संपूर्ण घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. तिने सांगितलं की, धडकेनंतर तिचं डोकं गाडीच्या खिडकीवर आदळलं आणि ती प्रचंड घाबरली होती. मात्र सध्या ती सुरक्षित असून तिची तब्येत ठिक असल्याचंही तिने स्पष्ट केलं.

आणखी वाचा – साऊथ अभिनेत्याचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन, रजनीकांत यांनी गमावला जवळचा मित्र, सिनेसृष्टीवर शोककळा

यावेळी नोराने नागरिकांना मद्यपान करून वाहन चालवू नये, असं आवाहन केलं. मद्य आणि अंमली पदार्थांमुळे अपघात होण्याचं प्रमाण वाढत असल्याबद्दल तिने चिंता व्यक्त केली. “लोकांनी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये, ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावी लागते याचं मला वाईट वाटतं,” अशा शब्दांत तिने आपली भावना व्यक्त केली. या घटनेनंतर नोराच्या चाहत्यांनी तिच्या प्रकृतीसाठी सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: bollywood newscelebrity car accidentsNora Fatehi Accident
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Marathi Movie

६ फेब्रुवारीला उडणार 'लग्नाचा शॉट', नव्या मराठमोळ्या चित्रपटाची चर्चा, उत्सुकता वाढली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.