बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या अभिनयाने नेहमी चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. त्याच्या सर्वच भूमिकांना चाहत्यांच्या पसंती मिळते. त्याच्या अनेक भूमिकाही आजही लक्षात राहणाऱ्या आहेत. पण आता तो तो त्याच्या चित्रपटामुळे नाही तर त्याची पत्नी आलिया सिद्दीकीमुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीनची पत्नी ही मोठ्या संकटात सापडली आहे. तिच्या विरोधात अंधेरी कोर्टात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. हा वॉरंट का जारी झाला? हे जाणून घेऊया. (Nawazuddin Siddiqui wife case)
आलियाच्या विरोधात अंधेरी कोर्टाने २९ फेब्रुवारी रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आलियाच्या मैत्रिणीने तिच्या विरोधात १३८ निगोशिएअबल कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी तिच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला. या कायद्याअंतर्गत चेक देण्याऱ्या व्यक्तीला २ वर्षे तुरुंगवास तसेच व्याजासह दुप्पट रक्कम द्यावी लागू शकते.
आलिया ‘बिग बॉस २’ मध्ये दिसली होती. तिने ‘होली काउ’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. तिची मैत्रीण मंजू एम गढवाल सह-निर्माती होती. मंजूने आलियाबरोबर या चित्रपटासाठी ३१ लाख ६८ हजार रुपये लावले होते. पण आलियाने ते पैसे परत केले नाहीत. त्यानंतर ५ वर्षांपूर्वी पैसे न दिल्याबद्दल आलियाविरोधात तक्रार दाखल केली होती. मंजूने एका मध्यमाशी बोलताना सांगितले की, “मी आलियाबरोबर एका चित्रपटाची निर्मिती केली होती. तेव्हा आलियाने माझ्या कुटुंबाकडूनही काही पैसे उधार घेतले होते. पण तिने ते परत केले नाहीत. तब्बल पाच वर्ष ही केस चालली पण अद्याप आलियाने पैसे परत केले नाहीत”.
आणखी वाचा – ‘बाईपण…’ नंतर ‘आईपण…’ ठरणार भारी! केदार शिंदे यांची मोठी घोषणा
ती नंतर म्हणाली की, “या केसची दोन वेळा सुनावणी झाली पण आलिया दोन्ही वेळा उपस्थित नव्हती. पहिल्या सुनावणीच्या वेळी तिचे वकील आले आणि सेटलमेंटबद्दल बोलू लागले. तसेच दुसऱ्या सुनावणीच्या वेळीही आलिया उपस्थित नव्हती”. आता तिच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. आता या केसची सुनावणी २ मे रोजी होणार आहे. मंजूने आलियाबरोबरच नवाजुद्दीनवरही आरोप लावले असून नवाजुद्दीन तिला साथ देत आहे असे तिचे म्हणणे आहे.
पुढे मंजू म्हणाली की, “पैशाच्या बाबतीत आमच्यामध्ये भांडण झाले आणि मला चित्रपटामधून काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पैशाची मागणी केली तेव्हा मला काही पैसे दिले. त्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईदेखील केली. तेव्हा त्यांनी मला एक पीडिसी चेक दिला पण तो चेक बाऊन्स झाला. त्यानंतर त्यांनी माझे कॉल उचलणेही बंद केले. मी आता त्यांच्याविरोधात FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्प्लॉइज) मध्येही तक्रार दाखल केली आहे”.