Urvashi Rautela Apologies To Saif Ali Khan : सैफ अली खानवर झालेला हल्ला सध्या चर्चेचा विषय आहे. भर रात्री सैफ अली खानवर घरात घुसून एका अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला होता. हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले, ज्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करावे लागले. सैफवर उपचार सुरु असून तो आता बरा असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याची माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सैफच्या तब्येतीबाबत आणि या घटनेबाबत वक्तव्य करत आहेत. तसेच बॉलिवूड कलाकारांनी सैफची व करीनाची भेट घेत विचारपूसही केलेली पाहायला मिळाली. इतकंच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांमध्येही काळजीच वातावरण पाहायला मिळत आहे.बॉलिवूड सेलेब्स सैफच्या स्थितीबद्दल विचारत असतानाच अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने भावनिक पोस्ट करत सैफची माफी मागितली आहे.
उर्वशी रौतेलने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरुन एका भावनिक पोस्टमध्ये सैफची माफी मागितली आहे. तिने लिहिले की, “मी अत्यंत दुःखाने आणि मनापासून माफी मागून हा संदेश लिहित आहे की, त्यावेळी मला माहित नव्हते की तुम्हाला काय झाले आहे. हे प्रकरण इतके गंभीर आहे हे मला माहीत नव्हते”.अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “मला लाज वाटते की, तुम्हाला झालेल्या वेदनांबद्दल दुःखी होण्याऐवजी मी येथे माझ्या डाकू महाराज चित्रपटाचे यश साजरे करत आहे आणि भेटवस्तू घेत आहे”. तिने पुढे लिहिले, “माझ्या मूर्खपणाबद्दल आणि असंवेदनशीलतेबद्दल क्षमस्व. या प्रकरणाचे गांभीर्य कळल्यावर मला खूप वाईट वाटले. मला तुमचे समर्थन करायचे आहे आणि तुमच्या सभ्यतेचे कौतुक करायचे आहे. मला तुमच्या सामर्थ्याबद्दल आदर आहे”.
आणखी वाचा – लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचे अपघाती निधन, ऑडिशनसाठी जात असताना ट्रकने चिरडलं अन्…; कुटुंबियांवर शोककळा

याशिवाय तिने असेही लिहिले की, “मला माझ्या वागण्याबद्दल खेद वाटतो आणि जर सैफला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर तो तिला न घाबरता विचारु शकतो”. यानंतर, तिने पुन्हा माफी मागितली आणि लिहिले की मी वचन देते की मी भविष्यात अधिक चांगले करेन आणि समजूतदारपणा दाखवेन. उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेव्हा उर्वशी रौतेलाला सैफवरील हल्ल्याबद्दल आणि त्याच्या प्रकृतीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने या प्रकरणावर बोलणे टाळले आणि तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डाकू महाराजबद्दल भाष्य केलं. सुरुवातीला ती म्हणाली की, “हे खूप दुर्दैवी आहे”. पण त्यानंतर ती म्हणाली, “डाकू महाराजांनी १०५ कोटी कमावले आहेत, माझ्या आईने एक डायमंड घड्याळ आणि वडिलांनी एक मिनी घड्याळ भेट दिली आहे”.
आणखी वाचा – नवरी नटली! सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, कुटुंबियांबरोबर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल
यानंतर सोशल मीडियावर लोक उर्वशीला ट्रोल करताना दिसली. आता तिची माफी मागणारी पोस्ट आली आहे ज्यामध्ये ती सैफची माफी मागताना दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत अभिनेत्रीची कानउघडणी केली आहे. एकाने लिहिले आहे की, “प्रत्येक परिस्थिती तिच्या इच्छेनुसार बनवण्यात ती माहिर आहे”. तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, “दीदी शो ऑफ करण्याची एकही संधी सोडत नाहीत”.