Aman Jaiswal Passed Away : मनोरंजन सृष्टीतून एक अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना समोर येत आहे, ती म्हणजे एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याच्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. अभिनेता त्याच्या दुचाकीवरुन ऑडिशनसाठी जात असताना हा अपघात झाला आणि यात त्याचे निधन झाले. हा अभिनेता आहे अमन जयस्वाल. जोगेश्वरी पश्चिममध्ये भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत अभिनेता अमन जयस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो अवघ्या २३ वर्षांचा होता. ‘ धरतीपुत्र नंदिनी’मधून अमनला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्याच्या या अपघाती निघानंतर मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. (aman jaiswal passed away)
अमन जैयस्वाल उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी होते. ‘धरतीपुत्र नंदिनी’मध्ये अमन मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय अमनने सोनी टीव्हीच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई‘ या मालिकेमध्ये यशवंत राव यांची भूमिका साकारली होती. हा शो जानेवारी २०२१ मध्ये सुरु झाला होता आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये संपला. अमनने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. अमन ऑडिशनसाठी स्क्रीन टेस्ट शूट करण्यासाठी सेटवर जात होता. या दरम्यान त्यांचा अपघात झाला.
आणखी वाचा – अप्पीच्या कारचा मोठा अपघात, संकटाची आधीच होती चाहुल, अर्जुन-अमोलचं पुढे काय होणार?
‘धरतीपुत्र नंदिनी’ या टीव्ही शोचे लेखक धीरज मिश्रा यांनी ‘इंडिया टुडे डिजिटल’ला दुजोरा देत म्हटलं की, या शोचे सर्वांचे आवडते कलाकार अमन जयस्वाल आता आपल्यात नाहीत.” तर अमन जैस्वाल यांच्या मृत्यूबाबत मुंबई डीसीपी झोन 9 दीक्षित गेडाम म्हणाले, “हिल पार्क रोडवर दुपारी ३.१५ वाजता ही घटना घडली. आरोपी ट्रकच्या चालकाने मोटारसायकल चालवणाऱ्या अमन जयस्वालला (मृत) चिरडले. त्यानंतर त्याला ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नेले, परंतू, त्याचा मृत्यू झाला होता”.
दरम्यान, अमनच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. ‘धरतीपुत्र नंदिनी’ची टीमही अभिनेत्याच्या आकस्मित निधनाच्या धक्क्यात आहे. अनेकांनी त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच त्याच्या अचानक निघून जाण्यावर शोकही व्यक्त केला आहे.