फराह खान ही बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका आहे. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक उत्तम गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. तिने शाहरुख खान स्टारर ब्लॉकबस्टर ‘ओम शांती ओम’ आणि ‘मैं हूं ना’ यांसारखे चित्रपटदेखील केले आहेत. व्यावसायिक जीवनात खूप यशस्वी असलेल्या फराह खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने शिरीष कुंदरशी लग्न केले आहे. या जोडप्याच्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत. फराह प्रसिद्धीच्या झोतात राहते आणि कायमच तिच्याबद्दलच्या चर्चा होत असतात. याउलट तिचा नवरा शिरीषला लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते. फराह दिग्दर्शित ‘मैं हूँ ना’ या चित्रपटादरम्यान ही जोडी पहिल्यांदा एकमेकांच्या जवळ आली होती. शिरीष या चित्रपटाचे एडिटर होते. (farah khan thought her husband is gay)
या जोडप्याचे नाते सकारात्मकतेने सुरु झाले नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फराहने खुलासा केला की, ती पूर्वी शिरीषचा तिरस्कार करत असे. अर्चना पूरण सिंहच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान फराहने शिरीषबरोबरची तिची प्रेमकहाणी सांगितली होती. फराहने खुलासा केला, “सहा महिन्यांपासून मला तो समलैंगिक वाटला होता”. शिरीषबद्दलच्या तिच्या भावना बदलल्या आहेत का, असे विचारल्यावर तिने गंमतीत असं म्हटलं की, “पूर्वी तो लगेच रागावायचा आणि जेव्हा तो रागवायचा तेव्हा खूप कठीण परिस्थिती व्हायची. कारण जो माणूस फक्त गप्प राहतो आणि नंतर बोलत नाही तो तुम्हाला त्रास होतो”.
आणखी वाचा – नवरी नटली! सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, कुटुंबियांबरोबर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल
त्यानंतर अर्चनाने फराहला भांडणात कोण आधी माफी मागतं असं विचारलं असतं फराह म्हणाली की, “कोणीही सॉरी म्हणत नाही. शिरीषने २० वर्षांत कधीही माफी मागितली नाही. कारण तो कधीच चुकीचा नसतो”. पुढे फराहने असंही म्हटलं की, “जर तो बोलला आणि मी माझ्या फोनकडे पाहिलं तर तो निघून जाईल”.
आणखी वाचा – लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचे अपघाती निधन, ऑडिशनसाठी जात असताना ट्रकने चिरडलं अन्…; कुटुंबियांवर शोककळा
दरम्यान, फराह खान आणि शिरीष कुंदर यांच्या लग्नाला २० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांची पहिली भेट फराह खानच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपट ‘मैं हूं ना’ दरम्यान झाली होती. हे जोडपं दोन मुली, दिवा आणि अन्या आणि एक मुलगा, झार यांचे पालक आहेत. २००८ मध्ये या जोडप्याने आयव्हीएफद्वारे त्यांच्या मुलांना जन्म दिला.