निवेदिता सराफ आणि अशोक सराफ ही सिनेमाविश्वातील एव्हरग्रीन जोडी आहे. सध्या ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिक राज्य करत आहे. सध्या ही जोडी परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे. निवेदिता यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. यांत त्या आणि वैक्युम क्लिनर नाटकाची संपूर्ण टीम ही सिडनी आणि मेलबर्न येथे गेली आह. सध्या नाटकांचे परदेश दौरे जोमाने सुरु झाले असून यांत वैक्युम क्लिनर हे नाटकही मागे राहिलेलं नाही. (Nivedita Saraf Ashok Saraf)
वैक्युम क्लिनर या नाटकाच्या प्रयोगाच्या दौऱ्यानिमित्त ही सगळी मंडळी परदेशात गेली आहेत. सिडनी आणि मेलबर्न येथे होणाऱ्या नाटकांच्या प्रयोगासाठी व्हॅक्युम क्लिनरची संपूर्ण टीम निघाली आहे. या व्हिडिओमध्ये निवेदिता सराफ यांच्यासोबत अशोक सराफ, निर्मिती सावंत आणि नाटकाची इतर टीम पाहायला मिळाले.
पाहा निवेदिता यांनी का मानले प्रेक्षकांचे आभार (Nivedita Saraf Ashok Saraf)
आता निवेदिता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिडनी येथील नाटकाच्या प्रयोगानंतरचा एक फोटो पोस्ट केला आहे, यांत निवेदिता यांनी कॅप्शन देत आभार व्यक्त केले आहेत. ‘खूप खूप धन्यवाद सिडनी आम्हाला हाऊसफुल्ल शो आणि अप्रतिम प्रतिसाद मिळाला, अभिनंदन. टीम व्हॅक्यूम क्लिनर. असं म्हटलंय.(Nivedita Saraf Ashok Saraf)
हे देखील वाचा – ‘मी विनय आपटेला मिस करतेय’ म्हणत सुकन्या मोने यांना आलं भरून
वैक्युम क्लिनरच्या टीमसोबत निवेदिता या देखील परदेश दौरा करण्यात व्यस्त आहेत. सध्या निवेदिता या भाग्य दिले तू मला या मालिकेत रत्नमाला मोहिते ही भूमिका साकारत आहेत. मात्र मालिकेतून ब्रेक घेत त्या सध्या परदेशात नाटकांच्या प्रयोगानिमित्त गेल्या आहेत. मालिकेत त्या तीर्थयात्रेला गेल्या आहेत असं दाखवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच निवेदिता यांनी त्यांचा लंडन येथील फोटो शेअर केला होता. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. मालिकेत तीर्थयात्रेला जातेय असं दाखवून निवेदिता या थेट लंडनस्वारी करण्यात व्यस्त असल्याने चाहत्यांचा कमेंट करण्याचा मोह आवरला नाही आहे.
