मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा इतका भाग होऊन जातात, की आपल्या आवडत्या मालिकेमध्ये त्या मालिकेच्या नायिकेला त्रास होऊ नये असं त्यांना वाटतं. त्रास देणाऱ्या खलनायिकेचा प्रेक्षक द्वेष करतात. आणि नायिकेला अनेक गोष्टी सुरुवातीला कळत नाहीत म्हणून नायिकेचा देखील राग येतो. आणि जेव्हा त्यांची आवडती नायिका खलनायिकेला धडा शिकवते तेव्हा सगळ्यात जास्त आनंद नक्कीच प्रेक्षकांना होतो.(Muramba Serial New Promo)
असं म्हणतात, मालिकेच्या यशामध्ये. मालिका कोणत्या वेळी लागते, कोणत्या चॅनेलवर लागते हे घटकही महत्वाचे असतात.आणि नक्कीच ते महत्वाचे असतात. परंतु काही मालिका या गोष्टींना अपवाद ही ठरतात.अशीच एक मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील, प्रवाह दुपार मधील मालिका मुरंबा.दुपारच्या वेळेत प्रक्षेपित होऊनही या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.रमाचं साधेपण, अक्षयच तिला सांभाळून घेणं, रमा-अक्षयची केमेस्ट्री आणि रेवाचा अक्षयला मिळवण्याचा अट्टहास याने मालिकेत अनेक वळण पाहायला मिळतात.
पाहा काय घडणार येत्या भागात ? (Muramba Serial New Promo)
यातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, सगळ्यांचं सगळं सहन करणारी रमा, सगळ्यांच्या चुका पोटात घेणारी रमा, अक्षयच्या साथीने तीच नवं रूप रेवा आणि आई आजींना दाखवणार आहे.रेवा गेला बराच काळ मुकादमांच्या घरात राहते आहे, आई आजी अनेक प्रयत्न करून रेवाच्या मदतीने रमाला अक्षयच्या आयुष्यातून काढण्याचा प्रयत्न करत आहेत,मैत्रिणीवरच्या विश्वासपोटी रमा बराच काळ हे सहन करत होती.
पण आता रमा रेवाकडे मुकादमांच्या घरात राहण्याचं भाडं मागते, त्यावर आई आजी तिला अडवतात, तेव्हा रमा त्यांनाही स्पष्ट उत्तर देते, घरच्या सारखं मानानं आणि असंन यात फरक आहे, त्यामुळे रेवाला स्वतःचा स्वाभिमान जपत रमा तिला घरभाडं द्यायला सांगते, रमाचं हे रूप बघून आई आजी आणि रेवाला धक्का बसतो. अक्षयला मात्र रमाचा अभिमान वाटतो, रमा रेवाला कसा धडा शिकवणार हे बघणं रंजक ठरणार आहे.(Muramba Serial New Promo)
हे देखील वाचा : बघण्याच्या कार्यक्रमात गाऊन दाखवली बैठकीची लावणी- वंदना गुप्तेंचा मजेशीर किस्सा