मंडळी तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजे जेष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ.आज या लाडक्या जोडीच्या लग्नाचा वाढदिवस त्या निमित्ताने जाणून घेऊयात अशोक सराफ यांच्या संघर्षाच्या काळात निवेदिता यांनी कशी दिली अशोक सराफ यांना साथ माझ्या जपलं ते आपलं या भागात.(Ashok Saraf Struggle Story)
सध्याच्या काळात आपण अनेक कलाकारांना लाग्नबंधनात अडकताना पाहतो रुपेरी पडद्यावर एकत्र काम करत करत एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या अनेक जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. असची एक अनेक वर्षांपासून एकत्र असलेली आणि एकेकाळी एकत्र काम करत करत खऱ्या आयुष्यात देखील सोबत आलेली जोडी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ.
या दोघांची प्रेमकहाणी ही चांगलीच हटके आहे. अगदी दोघांच्या वयात जास्त अंतर असलं तरीही प्रेमात मात्र अंतर नाही हे वेळो वेळी यांनी दाखवलेलं आहे. निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्या आत्मचरित्रात अभिप्राय मांडताना अशोक सराफ यांच्या एका हळव्या, निस्वार्थी भावनेचा एक किस्सा सांगितलं आहे.

निवेदिता यांनी सांगितल्याप्रमाणे अशोक सराफ हे सुरुवातीच्या काळात अभिनय क्षेत्रा सोबतच बँकेत देखील नोकरी केली. अशोक सराफ यांच्या सह अनेक चित्रपटांचं शूटिंग सुरुवातीला कोल्हापूर येते व्हायचं पण कालांतराने हे शूटिंग जास्त करून पुणे मुंबई येथे होऊ लागलं आणि कोल्हापुरात काम करत असलेल्या स्पॉटबॉईज म्हणून काम करणाऱ्या हातानं रोजगाराच्या संधी कमी होवू लागल्या.
बँकेतून कर्ज द्यायचे आणि हप्ता देखील स्वतःच भरायचे मामा(Ashok Saraf Struggle Story)
अशातच अशोक सराफ या लोकांसाठी धावून गेले. मामा त्यांच्या बँकेतून अनेकांना रिक्षा घेण्यासाठी कर्ज दिलं एवढंच नाही तर त्यांच्या कर्जाचा पहिला हफ्ता अशोक मामा स्वतःच्या पगारातून द्यायचे आणि त्यांना म्हणायचे ” रिक्षा चालू लागली कि पुढचे हफ्ते तुला देता येतील रे”. एवढच नाही तर कुणाला दुकान लावण्यासाठी, भेळपुरीचा गाडा टाकण्यासाठी देखील अशोक सराफ यांनी मदत केली.
हे देखील वाचा – “एक काळ गाजवणाऱ्या महानायकाला मिळत नाहीये काम” स्वतः व्यक्त केली खंत
फक्त अभिनय क्षेत्रातच नाही तर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशोक मामांच्या या बाजू बद्दल निवेदिता सराफ यांनी नेहमी सांगितलं आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या जोडीला प्रेक्षकांचं प्रेम मिळण्याचं कारण म्हणजे अनेक चित्रपटांमधून यांची खुलत गेलेली केमीस्ट्री. महाराष्ट्राच्या या लाडक्या जोडीला पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.