मराठी सिनेसृष्टीतील अनेक मराठी चित्रपट,नाटक,वेबसीरीज अश्या सर्वच स्थरांवर आपल्या अभिनयाची छाप अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पाडलीय. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत.त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या पसंतीस आजही उतरते.निवेदिता सराफ सध्या भाग्य दिले तू मला या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतात.यासोबत त्या सोशल मीडियावर देखील सक्रिय असून नेहमी त्या कुटुंबातच्या सदस्यासाठी खास पोस्ट देखील करतात.(Nivedita Saraf)
निवेदिता सराफ यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा फोटो शेअर केला. तर ही व्यक्ती आहे त्यांची बहीण मीनल परांजपे. आम्ही दोघी बहिणी जोडीच्या जोडीच्या असं कॅप्शन त्यांनी या फोटोला देत हा फोटो शेअर केला. त्यांचा हा फोटो चाहत्यांना आवडला असून अनेक चाहत्यांनी झकास,खूप छान,सुंदर जोडी आहे, अश्या अनेक कमेंटचा वर्षाव केलाय.

तर तुम्हाला माहित आहे का.निवेदिता सराफ यांची बहीण ही एक डॉकटर आहे.यासोबत त्या देखील अभिनेत्री असून निवेदिता सराफ यांच्या घरात अभिनयाचा वारसा आहे. निवेदिता जोशी सराफ या अशोक सराफ यांच्या पत्नी असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.त्यांची जोडी तर सिनेसृष्टीतील एक एव्हर ग्रीन जोडी म्हणून ओळखली जाते.पण तुम्हाला माहीत आहे का, निवेदिता सराफ यांचे आई वडील दोघेही कलाकार असून त्यांची बहीण देखील एक अभिनेत्री आहे. त्यांचे वडील गजन जोशी यांनी ७० च्या दशकातील दैवाचा खेळ, आधार, अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. निवेदिता यांची आई विमल जोशी यांनी संजीव कुमार,बलराज सहानी अशा अनेक कलाकारांसोबत हिंदी नाटकांत काम केले होते.(Nivedita Saraf)
हे देखील वाचा – ..म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटाला मृणाल कुलकर्णी यांनी दिला होता नकार
यासोबतच निवेदिता जोशी यांच्या बहिणीने डॉक्टरेट केली असली तरी त्यांनी अभिनयाचा छंद देखील त्यांनी जोपासला आहे. डॉ मीनल परांजपे असे त्यांच्या बहिणीचे नाव असून अरण्यक या नाटकात त्यांनी कुंतीची भूमिका साकारली होती. तसेच ध्यासपर्व या चित्रपटात देखील त्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. पण सध्या त्यांची बहीण ही सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण या बहिणींमध्ये अतोनात प्रेम पाहायला मिळतं.
