सध्या चित्रपटसृष्टीत राजकीय व्यक्तींच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट येत आहे. आता या यादीत आणखी एका व्यक्तीचा समावेश झाला आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी त्यांनी सर्वाधिक काळ काम केलं आहे. त्यामुळेच त्यांची ओळख “हायवे मॅन ॲाफ इंडिया” अशी बनली आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या या लोकप्रिय नेत्याच्या जीवनावर आधारित एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘गडकरी’ असं या चित्रपटाचं नाव असून ज्याचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. (Gadkari Movie Announcement)
अभिजीत मजुमदार प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय देशमुख फिल्म्स बॅनरअंतर्गत अक्षय अनंत देशमुख यांनी केली आहे. तर चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. या चित्रपटात नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार? हे मात्र समोर आले नाही. लवकरच चित्रपटाचा टीझर व ट्रेलर प्रदर्शित होणार असून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
हे देखील वाचा – “१८ वर्ष प्रेमात अन्…”, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उमेश कामतने बायकोला लिप किस करतानाचा फोटो केला शेअर, म्हणाला, “वेडेपणा…”
चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग भुसारी याबद्दल बोलताना म्हणाले, “नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. एक अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक या त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकीय प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळदेखील तितकेच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास रसिक प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून करण्यात आला आहे.”
हे देखील वाचा – Video: बोल्ड संवाद, कॉमेडी अन्…; ‘बॉईज ४’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, गौरव मोरेचा लूक पाहून सर्वत्र होतंय कौतुक
अनुराग भुसारी दिग्दर्शित या चित्रपटात राहुल चोपडा, ऐश्वर्या डोरले, तृप्ती कालकर, अभिलाष भूसारी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. संगीत अजित परब, राधिका भुसारी यांचे आहे. तर अनुराग भुसारी, मिहिर फाटे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. येत्या २७ ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.