सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Nitin Desai Funeral : नितीन देसाईंच्या अंतिम दर्शनासाठी मराठी कलाकारांची गर्दी, आमिर खानचीही हजेरी, पण इतर बॉलिवूडकरांनी फिरवली पाठ?

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 4, 2023 | 5:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
No Bollywood stars in Nitin Desai Funeral except Amir Khan

Nitin Desai Funeral : नितीन देसाईंच्या अंतिम दर्शनासाठी मराठी कलाकारांची गर्दी, आमिर खानचीही हजेरी, पण इतर बॉलिवूडकरांनी फिरवली पाठ?

Nitin Desai Funeral Update : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी (२ ऑगस्ट) गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने अवघं कलाविश्व शोकसागरात बुडाला आहे. आत्महत्येनंतर आज दोन दिवसांनी नितीन देसाई यांच्या पार्थिवावर कर्जत येथील एन.डी. स्टुडिओवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Nitin Desai Funeral)

एन.डी. स्टुडिओमधील ‘जोधा अकबर’ चित्रपटाच्या सेटवर नितीन देसाईंचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. संध्याकाळी चार वाजता त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान आज सकाळपासून एन.डी. स्टुडिओच्या बाहेर अनेकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून अनेक राजकीय नेते व कलाकारांनी नितीन देसाईंच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेता सुबोध भावे, अभिजीत केळकर, अभिनेत्री मानसी नाईक, रीना मधुकर यांसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींनी नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

हे देखील वाचा – Sudhir salvi on nitin desai : लालबागच्या राजासाठी नितीन देसाईंनी पाहिलेलं ‘ते’ स्वप्न राहिलं अपूर्ण, ७० ते ८० टक्के काम पूर्णही झालं होतं पण…

मात्र ज्या नितीन देसाईंनी अनेक बॉलीवूड चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले. त्या बॉलीवूडने नितीन देसाई यांच्या अंतिम दर्शनाकडे पाठ फिरवली आहे. केवळ अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर वगळता बॉलीवूडमधील एकही बडा स्टार नितीन देसाईंच्या अंतिम दर्शनाला आलेला दिसला नाही. (No Bollywood stars in Nitin Desai Funeral except Amir Khan)

हे देखील वाचा – Ravi Jadhav on Nitin Desai: “तेव्हा त्यांनी मला फोन केला अन्…” नितीन देसाईंना अखेरचा निरोप देताना रवी जाधव भावुक, म्हणाले, “मला एनडी स्टुडिओमध्ये बोलावलं होतं कारण…”

दरम्यान, त्यांच्या अंतिम दर्शनावेळी नितीन देसाईंचे कुटुंब आणि एनडी स्टुडिओमधील कर्मचाऱ्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. नितीन देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई असा परिवार असून त्यांच्या अश्या जाण्याने नितीन देसाईंच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Tags: amir khanmarathi flim industryNitin Desai Funeral
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Actress Suffer From Health Issue

Actress Suffer From Health Issue: कर्करोगावर मात केल्यानंतर आणखी एका आजाराचा सामना करतेय ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “श्वास घेण्यासाठीही…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.