Radhika Merchant Birthday Video : अनंत अंबानीबरोबरच्या लग्नानंतर राधिका मर्चंट आता अंबानी कुटुंबाची धाकटी सून बनली आहे. मुकेश व नीता अंबानी यांच्या लाडक्या सूनेचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करण्यात आला. अलीकडेच, अंबानी कुटुंबाने राधिकाचा वाढदिवस त्यांच्या अँटिलिया येथील आलिशान घरात साजरा केला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राधिका मर्चंटच्या वाढदिवसाचा हा व्हिडीओ कालचा आहे. या व्हिडीओमध्ये राधिका अँटिलिया येथील तिच्या सासरच्या घरी कुटुंबाबरोबर वाढदिवस साजरा करत आहे. व्हिडीओमध्ये राधिका मर्चंटने पांढऱ्या टॉपसह लाल स्कर्ट घातलेला दिसत आहे. यामध्ये राधिका आधी केक कापताना आणि नंतर एक-एक करुन सर्वांना खाऊ घालताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये राधिकाची सासू अर्थात नीता अंबानीही अतिशय सुंदर लूकमध्ये दिसली. तिने फिकट हिरव्या रंगाचा रफल ड्रेस घातला आहे. नीता अंबानी यांची दोन मुले आणि पती मुकेश अंबानी देखील व्हिडीओमध्ये दिसत आहेत. आपल्या धाकट्या सूनेचा वाढदिवस साजरा करत नीता अंबानी खुश दिसत आहेत. यावेळी त्या नाचतानादेखील दिसल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहतेही या व्हिडीओवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू-आदित्यचे जुळतायत सूर, मारुतीची त्यांच्या मैत्रीला नापसंती, पुढे काय होणार?
अनंत अंबानीशी लग्न केल्यानंतर राधिका मर्चंटची ही पहिलीच वाढदिवसाची पार्टी होती, जी अंबानी कुटुंबीयांच्या घरी अँटिलिया येथे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसह साजरी करण्यात आली. महेंद्रसिंग धोनी उर्फ एमएस धोनीनेही ओरीबरोबर पोज दिली. या पार्टीत शाहरुख खान व गौरी दिसले नाहीत, पण त्यांची दोन मुलं सुहाना व आर्यन या पार्टीत सहभागी झाले होते. जान्हवी कपूर, अनन्या पांडे, रणवीर सिंग, अर्जुन कपूर यांचीही या पार्टीमध्ये हजेरी दिसली.
आणखी वाचा – “हलक्यात घेऊ नका”, सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गॅंगकडून पुन्हा धमकी, केली ‘इतक्या’ कोटींची मागणी अन्…
राधिका मर्चंटने या वर्षी जुलैमध्ये नीता व मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीबरोबर लग्न केले. दोघेही लग्नाआधी अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. यानंतर अनंत व अंबानी यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचा उत्सव अनेक महिने सुरु असल्याचं दिसलं. ज्यासाठी अनेक स्वागत समारंभही आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये राजकारण्यांपासून बॉलिवूडपर्यंत अनेक बड्या व्यक्तींनी सहभाग घेतला होता. लग्नाआधी दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्सही मोठ्या थाटामाटात पार पडले. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनीही सहभाग घेतला होता.