Salman Khan Receives New Death Threat : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली असल्याचं समोर आलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अवघ्या पाच दिवसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने ही धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी मुंबई वाहतूक नियंत्रणाला धमकीचा संदेश आला आहे. संदेश देणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचे असल्याचे सांगितले आहे. यात ५ कोटींचाही उल्लेख आहे. ५८ वर्षीय सलमान खानला गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून धमक्यांचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी सलमानला वाय सुरक्षा दिली आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हत्येनंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.
ताज्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर धमकीचा मेसेज आला आहे. त्यात म्हटले आहे की, लॉरेन्स बिश्नोईबरोबरचा दीर्घकाळ चाललेला वाद मिटवला जाऊ शकतो आणि त्यासाठी सलमान खानकडून ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बिश्नोई टोळीचा जवळचा असल्याचे सांगितले आहे. सलमान खानने पैसे न दिल्यास त्याचे नशीब बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट होईल, असे धमकीवजा पत्र लिहिले आहे.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू-आदित्यचे जुळतायत सूर, मारुतीची त्यांच्या मैत्रीला नापसंती, पुढे काय होणार?
ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला आहे, ज्याच्या शेवटी ‘हलक्यात घेऊ नका’, असेही लिहिले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानला मिळालेल्या या नव्या धमकीची चौकशी सुरु झाली आहे. गुन्हे शाखा त्याची गांभीर्याने दखल घेत आहे. संदेश पाठवणाऱ्याचा माग काढला जात आहे. याशिवाय यामागे काही खोल कट आहे का, याचाही तपास सुरु आहे. दुसरीकडे, सलमान खानच्या कुटुंबीयांना त्याच्या सुरक्षेची चिंता आहे. बिश्नोईने सिद्दिकीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती, परंतु सखोल कट लपवण्याचा हा डाव असू शकतो, असे कुटुंबाच्या जवळच्या सूत्राने सांगितले. सूत्राने इंडिया टुडेला सांगितले की, “एखाद्याला तुरुंगातून काम करणे खरोखर सोपे आहे का आणि कोणीतरी सलमानला घाबरवण्यासाठी बाबा सिद्दीकींवर हल्ला का करेल? हे सर्व अतिशय संशयास्पद दिसते”.
आणखी वाचा – Bigg Boss फेम अभिजीत सावंतने सुरु केलं व्लॉगिंग, बायकोबरोबरचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, अरबाज खाननेही सलमान खानची सुरक्षा आणि बाबा सिद्दीकीच्या हत्येबाबत मौन सोडले आहे. तो म्हणाला, “आम्ही ठीक आहोत. मी असे म्हणणार नाही की आम्ही पूर्णपणे ठीक आहोत, कारण सध्या कुटुंबात बरेच काही चालू आहे. प्रत्येकजण चिंतेत आहे. आम्ही शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकार आणि पोलिसांसह प्रत्येकजण आणि आम्ही देखील हे सुनिश्चित करत आहोत की गोष्टी सुरळीत व्हाव्यात आणि सलमान भाई सुरक्षित राहतील”. बाबा सिद्दीकी त्यांच्या सोशलाईट इमेज आणि भव्य इफ्तार पार्टीसाठी ओळखले जात होते. ते अनेक बॉलिवूड स्टार्सच्या जवळ होते. त्यांच्या हत्येने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. या घटनेनंतर सलमान खानच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे.