रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : कॅप्टन होताच निक्कीच वागणं बदललं, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, जान्हवीचाही घेतला समाचार, म्हणाली, “तू मालकीण नाही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 24, 2024 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
surekha kudachi on Bigg Boss Marathi 5

कॅप्टन झाल्यावर बदललेली वागणूक पाहून निक्की तांबोळीवर मराठमोळी अभिनेत्री भडकली, पोस्ट व्हायरल

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस’ सुरु झालं तेव्हापासून अनेक कलाकार मंडळी आपलं मत सोशल मीडियाद्वारे व्यक्त करताना दिसतात. ‘बिग बॉस’च्या पर्वात स्पर्धकांकडून होणाऱ्या सततच्या चुका या प्रेक्षकांना, कलाकार मंडळींनाही पटत नाही आहेत या चुका दुरुस्त करायच्या सोडून ही स्पर्धक मंडळी पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वातील टीम ए मधील निक्की, जान्हवी, अरबाज, वैभव या साऱ्या स्पर्धकांवर प्रेक्षकांचा, कलाकार मंडळींचा रोष असलेला पाहायला मिळतोय. ‘बिग बॉस’च्या घरात वावरत असताना कोणतंच तारतम्य न बाळगता ही स्पर्धक मंडळी अरेरावी करत इतर स्पर्धकांवर वर्चस्व गाजवताना दिसतात आणि हे वर्चस्व साऱ्यांना खटकू लागल्याचे पाहायला मिळत आहे.

टीम बी मधील धनंजय पोवार, आर्या जाधव, अंकिता वालावलकर, पॅडी कांबळे, सूरज चव्हाण या स्पर्धकांना संपूर्ण महाराष्ट्र पाठिंबा देताना दिसतोय. टीम बीच्या स्पर्धकांचा खेळ उत्तम आहे. तरीसुद्धा टीम ए मधील स्पर्धकांना हवा तितका ओरडा दिला जात नाही यामुळे प्रेक्षक मंडळी रितेशवरही नाराज असल्याचे पाहायला मिळाले. अनेक कलाकार मंडळी या स्पर्धकांवर भाष्य करत आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. यापैकी एक अभिनेत्री म्हणजेच सुरेखा कुडची. लावणीक्वीन सुरेखा कुडची यांनी ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस मराठी’ फेम या अभिनेत्रीने आता ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वातील स्पर्धकांंबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीने आर्याला जेवणावरुन टोकलं, शोमधील त्रास रॅपरला सहन होईना, घराबाहेर पडायचं असल्याचंही सांगितलं आणि…

View this post on Instagram

A post shared by Surekha Kudchi (@surekha_kudachi)

याआधीही सुरेखा अनेकदा निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल या स्पर्धकांबद्दल व्यक्त होताना दिसल्या. आता यानंतर नुकत्याच झालेल्या भागात कॅप्टन पदाचा मानकरी निक्की झाल्यानंतर निक्कीचं वागणं बदललं असल्याचं म्हणत सुरेखा या पुन्हा एकदा निक्कीवर भडकल्या आहेत. सुरेखा यांनी पोस्ट शेअर करत, “निक्की अगं ते घर सर्वांच आहे. तू मालकीण नाही आहेस. आणि काय ग तू म्हणशील ती पूर्व दिशा का ?, तुझ्या कॅप्टन्सीच्या वेळेस सगळ्यांनी तुझ ऐकायचं का तर तू सगळ्यांशी नीट वागते म्हणून आणि अंकिता कॅप्टन असताना तू किती छळलंस गं सगळ्यांना. आठवतं नाही का बाईई”.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : दिशाचा प्रीतम विरोधातील डाव यशस्वी, अहिल्यादेवींच्या नजरेतून पाडलं आणि…; पारू योग्य तो न्याय मिळवून देणार का?

पुढे त्यांनी, “नुसता तोंडाचा पट्टा चालू असतो. दुसऱ्या मॅडम काय शांत झाल्या वाटतं. कल्पना दिली असावी प्रकरण तापलंय शांततेत घे म्हणून. उद्याची वाट अख्खा महाराष्ट्र पाहतोय. भाऊचा धक्का. या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला या घरात स्थान नाही”, असं म्हटलं आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5surekha kudachi angry post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
shaka laka boom boom fame kinshuk vaidya engagement

‘शाका लाका बूम बूम’फेम संजूचा थाटामाटात साखरपुडा, लवकरच लग्नबंधनात अडकणार, कोण आहे त्याची पत्नी?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.