भारतातील नंबर वन रियालिटी शो म्हणून बिगबॉस हा कार्यक्रम ओळखला जातो. बिग बॉस मराठी असो की हिंदी कायमच प्रेक्षकांच्या मनोरंजन यादीत अव्वल स्थानावर राहिला आहे. बिगबॉस मराठी सिझन चारचा काही दिवसांपूर्वी निकाल लागला. या पर्वाचा विजेता अक्षय केळकर हा ठरला. परंतु हिंदी बिग बॉसचा अवधी वाढवल्यामुळे बिग बॉस हिंदीचं हे पर्व अजून सुरूच आहे.(shiv thakare big boss 16)
बिग बॉस हिंदीच्या या पर्वात मराठी बिग बॉस २ चा विजेता मराठमोळा शिव ठाकरे सध्या हे पर्व गाजवताना दिसतोय. शिवचा स्वभाव प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचं दिसतोय. ट्विटरवर हॅशटॅग्स विजयी भाव शिव मिलियनमध्ये ट्रेंडिंगवर करत आहे. तर शिवच्या चाहत्यांनी काही दिवसांपूर्वी एक भव्य रॅली काढत शिवला पाठींबा दर्शवला होता.
====
हे देखील वाचा – ‘कितना तडप रहे वीणा से मिलने को’ हातावरचा वरचा टॅटू बघून अनुपम खेर यांचा शिवला सवाल
====
शिवला राजकीय तसेच सिनेसृष्टी या दोन्ही क्षेत्रातून पाठींबा मिळतोय. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शिव ठाकरेसाठी पोस्ट शेअर केली आहे. महेश मांजरेकरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शिव ठाकरेचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी “पात्र असलेला स्पर्धक” असं कॅप्शन दिलं आहे.(shiv thakare big boss 16)
शिवचा फोटो शेअर करत महेश मांजरेकरांनी ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाची ट्रॉफी जिंकावी, यासाठी चाहत्यांना वोट करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे. सिनेसृष्टीतील महेश मांजरेकरांसोबतच सिद्धार्थ जाधव, मेघा धाडे, माधव देवचक्के, हिना पांचाळ यांसारख्या मंडळींनी शिवसाठी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर करत शिवला वोट करण्याचं आव्हान केलं आहे.
राजकीय क्षेत्रातून शिव ठाकरेला पाठींबा (shiv thakare big boss 16)
तसेच महाराष्ट्रातील आघाडीचे राजकारणी नेते बच्चु कडू, अमेय खोपकर तसेच नवनीत राणा आणि अनेक नेत्यांनी शिवला आमचा पाठींबा असल्याचं सांगितलं आहे. त्यातील बच्चु कडू यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट शेअर करत शिवला पाठिंबा दर्शवला आहे, तर मनसे नेते अमेय खोपकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत “आमच्या सर्वांचा अभिमान, महाराष्ट्राची शान शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी’च्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचला आहे. अंतिम फेरीसाठी शुभेच्छा”, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. तसेच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडियो शेअर करत भाष्य केलं “नमस्कार, कलर्स वाहिनीवरील बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात आपल्या अमरावतीची शान शिव ठाकरे सहभागी झाला आहे.

शिव पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत फार प्रामाणिकपणे त्याचा खेळ खेळत आहे.”“त्यामुळे मी एक लोकप्रतिनिधी आणि अमरावतीची नागरिक असल्याच्या नात्यानं मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की, यंदा एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या शिव ठाकरेला आपण पाठिंबा देऊ या. त्या बरोबरच त्याला भरघोस मत देऊन बिग बॉसचा विजेता ठरवू या.” असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.(shiv thakare big boss 16)