रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खाननंतर नेहा कक्करला इशारा, थेट व्हिडीओ शेअर करत केलं सावध, म्हणाले, “अश्लील कृत्ये सहन करणार नाही आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 17, 2024 | 12:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Neha Kakkar and rohanpreet singh

सलमान खाननंतर नेहा कक्करला इशारा

Neha Kakkar  : सध्या सलमान खान बॉलिवूडमधील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर मुनव्वर फारुकीचे नावही गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये आले आहे. यानंतर आता बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि तिचा पती गायक रोहनप्रीत सिंग यांनाही व्हिडीओ शेअर करत धमक्या आल्या आहेत. मात्र, इथे नेहा कक्करला धमकावणारी लॉरेन्स बिश्नोई टोळी नसून बाबा बुढा दलाचा निहंग मानसिंग अकाली आहे. नेहाने तिच्या पतीला पडद्याआड ठेवावे आणि लोकांसमोर आक्षेपार्ह कृती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

पंजाबी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप करत, सोशल मीडियावर चुकीचा मजकूर टाकणाऱ्यांना आधी प्रेमाने समजावून सांगितले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. यानंतर त्यांना दुसऱ्यांदा धडा शिकवला जाईल, त्यासाठी तुरुंगात जावे लागले तरी चालेल. समाजात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता पसरु दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडीओमध्ये निहंग मानने म्हटले आहे की, “आता बॉलिवूड गायिका नेहा कक्करची वेळ आहे. कृपया आमचा संदेश नेहा कक्करला द्या की तिने तिच्या पतीला पडद्यामागे ठेवावे. तुम्ही लोकांनी पंजाबचा ताफा उद्ध्वस्त केला आहे. थोडी तरी लाज वाटली पाहिजे, काय वस्तू घेऊन बसला आहात? आम्ही मान्य केले की तुम्ही लोक फिल्मस्टार आणि चांगले गायक आहात, त्यामुळे काही चांगले काम करा आणि तुमचे विचारही चांगले ठेवा. तुम्ही लोक तुमच्या मुलांना काय संस्कार देणार आहात?”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’नंतर सूरज चव्हाण व पॅडी कांबळेची भेट, एकमेकांना घट्ट मिठी मारली अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar)

या व्हिडीओमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, “सध्या पंजाबमध्ये ड्रग्ज आणि अश्लीलतेच्या दोन नद्या वाहत आहेत. स्वैराचार करणारा दुसरा कोणी नसून आपलेच सरदार भाई आहेत. पण, ते लोक खरे सरदार नाहीत, तर ते इकडून तिकडे येऊन सरदार झाले आहेत. ज्यांना वडिलोपार्जित मस्तकपद मिळाले आहे ते त्याचा आदर करतात. मला लाहोरचा दरवाजा म्हणतात. बरेच लोक आमच्या रडारवर आहेत. सोशल मीडियावर चुकीचा मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सर्वांकडे आमचे लक्ष असते. प्रत्येकाला एकदा प्रेमाने समजावले जाईल आणि दुसऱ्यांदा धडा शिकवला जाईल”.

आणखी वाचा – खुशबू तावडेने पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा सुंदर फोटो, नावही आहे खूप खास, पोस्ट पाहून कौतुकाचा वर्षाव

अकाली मानसिंग हे सिंह बाबा बुढा दलाचे आहेत. लोकांना मदत करण्यासाठी आणि सोशल मीडियावर असभ्यता, अश्लीलता पसरवणाऱ्या शीख लोकांविरोधात आवाज उठवण्यासाठी तो प्रसिद्ध असल्याचे म्हटले जाते. येथे हे देखील नमूद केले पाहिजे की मानसिंग अकाली यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचा नंबर देखील जारी केला आहे.

Tags: bollywood gossipneha kakkarneha kakkar and rohanpreet singh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Liam Payne Death

तिसऱ्या मजल्यावरुन पडून सुप्रसिद्ध गायकाचा मृत्यू, वयाच्या ३१ व्या वर्षी निधन, कारणही आले समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.