बॉलिवूड सिनेसृष्टीत आपलं स्थान बळकट करण्यासाठी कुणीतरी गॉडफादर असणं आवश्यक असतं असं म्हटलं जातं. पण या क्षेत्रातील या नियमाला अपवाद ठरणाऱ्या काही कलाकारांनी स्वमेहनतीच्या जोरावर व अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. यांत एका अभिनेत्याचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. छोट्याशा खेडेगावातून नोकरीसाठी दिल्ली व नंतर अभिनयाच्या वेडापोटी मुंबई गाठणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकी याने बॉलिवूडमध्ये स्वतःच स्थान कमावलं आहे. (Nawazuddin Siddiqui Incident)
अभिनेत्याने आजवर अनेक मुलाखतींमधून बरंच भाष्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे. यावेळी त्याने त्याला असणाऱ्या व्यसनांबाबत भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे. दारूबद्दल विचारण्यात येताच उत्तर देत अभिनेता म्हणाला, “मी क्वचितच दारू पितो पण मी खूप कमी पितो, थोडी प्यायलावरही मला झेपत नाही”. त्यानंतर अभिनेत्याने पहिल्यांदा दारू पिण्याबाबत भाष्य केलं.
आणखी वाचा – प्रथमेशने मुग्धाच्या बहिणीला दिलं खास सरप्राइज, मेहुणीबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…
याबाबत बोलताना तो म्हणाला, “मी पहिल्यांदा एनएसडीमध्ये होतो तेव्हा दारू प्यायलो होतो. एका नाटकानंतर आम्ही आनंद साजरा करत होतो, तेव्हा सर्वांनी बिअर आणली. त्याआधी मी कधीही दारू प्यायलो नाही. मी खूप साधा होतो. मी नाटकात पहिल्यांदा धूम्रपान केलं होतं”. यापुढे आणखी एक किस्सा सांगत नवाजुद्दीन म्हणाला, “माझा आवडता सण होळी आहे. कारण त्या उत्सवात तुम्हाला मद्यपान करायला मिळतं”. होळीचा एक किस्सा सांगत पुढे तो म्हणाला, “एकदा स्वानंद किरकिरेंनी त्याला थंडाई प्यायला लावली होती, त्यानंतर थंडाईची नशा चढली आणि दोन दिवस तो त्या नशेत होता”.
या मुलाखतीत त्याला गांजा या व्यसनाबाबत विचारलं त्यावरही अभिनेत्याने दिलेलं उत्तर लक्षवेधी होतं. ज्या ठिकाणी गांजाला कायदेशीर मान्यता आहे अशा ठिकाणी त्याने गांजा ओढला आहे का? असं विचारल्यावर नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, “मला गांजा ओढणं खूप आवडतं. मला खूप चांगलं वाटतं. गांजा ओढताना गाणी लावल्यानंतर मी वेगळ्याच धुंदीत असतो” असंही तो म्हणाला.