शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

यशने रेवतीला दिली प्रेमाची कबुली, एजेंसमोर सत्य येणार का?, लीलाचा पाठिंब कायम पण…

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 25, 2024 | 4:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla Serial Updates Yash confessed his love to Revati in the and now the truth of their love know to AJ

यशने रेवतीला दिली प्रेमाची कबुली, एजेंसमोर एजेंसमोर सत्य, मालिका निर्णायक वळणावर

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून लीलाची बहीण रेवतीच्या लग्नाचे कथानक सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. लीलाने रेवतीला तिचे लग्न यशबरोबर लावून देणार असल्याचे वचन दिलं. पण एजेंच्या मनात काही वेगळंच होतं. श्वेताचे एजेंबरोबर लग्न ठरले होते, पण काही कारणांमुळे लीलाचे लग्न एजेंबरोबर होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी एजेंनी श्वेताबरोबर यशचे लग्न लावणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुर्गाच्या दबावामुळे यश आणि रेवती एजेला खरे सांगत नाहीत. (Navri Mile Hitlerla Serial Updates)

लीला रेवतीला एजेकडे यशबद्दलच्या तिच्या प्रेमाची कबुली देण्यास भाग पाडते, पण किशोर रेवतीचा अपघात घडून आणण्याचं प्लॅनिंग करतो. यशला इमर्जन्सी कॉल येतो आणि तो हॉस्पिटलमध्ये धावतो. दुर्गा यशला ब्लॅकमेल करत रेवतीला विसरायला सांगते. अन्यथा ती तिच्या वैद्यकीय खर्चासाठी पैसे देणार नाही असं यशला सांगते. लीलाला, या अपघातामागे दुर्गाचा हात असल्याचा संशय आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी झालेल्या भागात एजेंना रेवतीच्या खऱ्या प्रेमाची जाणीव होणार असून ते रेवतीला तुझ्यामुळे मी माझा शब्द मागे घेत असल्याचे सांगतात.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – बजरंग जेलमध्ये नाही तर हॉस्पिटलमध्येच असल्याचे सत्य अक्षरा सर्वांसमोर आणणार, भुवनेश्वरीचाही खरा चेहरा समोर?

अशातच आता मालिकेत पुढे यश रेवतीकडे त्याचं प्रेम जाहीर करतो आणि त्याचे हे बोलणे एजे ऐकतात. रेवतीचा झालेला अपघात हा माझ्यामुळेच झाल्याचे यश तिच्यासमोर व्यक्त करतो. मी तुझा खूप मोठा विश्वासघात केल्याचेही तो म्हणतो आणि त्याचे हे बोलणे एजे ऐकतात. एजेंना पाहून यशला मोठा धक्काच बसतो. पुढे लीला अपघातानंतर घरी जाते. तिला वाटतं की तिच्या स्वागतासाठी घरातील सगळे तयारी करुन असतील. पण तसं काहीच होत नाही. यावेळी एजेंची आईदेखील तिच्या बरोबर नीट वागत नाहीत.

आणखी वाचा – तितीक्षा तावडेचा नवा विक्रम, युट्यूबकडून अभिनेत्रीचा सन्मान, म्हणाली, “२०२३मध्ये चॅनल सुरु केलं आणि…”

त्यामुळे आता एजेंना रेवतीच्या प्रेमाची जाणीव झाल्यामुळे ते यश व रेवतीचे लग्न लावणार का? यश-रेवतीच्या प्रेमामुळे लीला व एजे यांच्या नात्यावर काही परिणाम होणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे आता यश-रेवती यांच्यातील प्रेम टिकणार की नाही? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहता येणार आहे.  

Tags: Navri Mile Hitlerla Marathi SerialNavri Mile Hitlerla Marathi Serial UpdatesNavri Mile Hitlerla Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
mallika sherawat on relationship

परदेशातील बॉयफ्रेंडबरोबर मल्लिका शेरावतचं ब्रेकअप, म्हणाली, "मी दारु, सिगारेट पित नाही आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.