‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून लीलाची बहीण रेवतीच्या लग्नाचे कथानक सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. लीलाने रेवतीला तिचे लग्न यशबरोबर लावून देणार असल्याचे वचन दिलं. पण एजेंच्या मनात काही वेगळंच होतं. श्वेताचे एजेंबरोबर लग्न ठरले होते, पण काही कारणांमुळे लीलाचे लग्न एजेंबरोबर होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी एजेंनी श्वेताबरोबर यशचे लग्न लावणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुर्गाच्या दबावामुळे यश आणि रेवती एजेला खरे सांगत नाहीत. (Navri Mile Hitlerla Serial Updates)
लीला रेवतीला एजेकडे यशबद्दलच्या तिच्या प्रेमाची कबुली देण्यास भाग पाडते, पण किशोर रेवतीचा अपघात घडून आणण्याचं प्लॅनिंग करतो. यशला इमर्जन्सी कॉल येतो आणि तो हॉस्पिटलमध्ये धावतो. दुर्गा यशला ब्लॅकमेल करत रेवतीला विसरायला सांगते. अन्यथा ती तिच्या वैद्यकीय खर्चासाठी पैसे देणार नाही असं यशला सांगते. लीलाला, या अपघातामागे दुर्गाचा हात असल्याचा संशय आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी झालेल्या भागात एजेंना रेवतीच्या खऱ्या प्रेमाची जाणीव होणार असून ते रेवतीला तुझ्यामुळे मी माझा शब्द मागे घेत असल्याचे सांगतात.
आणखी वाचा – बजरंग जेलमध्ये नाही तर हॉस्पिटलमध्येच असल्याचे सत्य अक्षरा सर्वांसमोर आणणार, भुवनेश्वरीचाही खरा चेहरा समोर?
अशातच आता मालिकेत पुढे यश रेवतीकडे त्याचं प्रेम जाहीर करतो आणि त्याचे हे बोलणे एजे ऐकतात. रेवतीचा झालेला अपघात हा माझ्यामुळेच झाल्याचे यश तिच्यासमोर व्यक्त करतो. मी तुझा खूप मोठा विश्वासघात केल्याचेही तो म्हणतो आणि त्याचे हे बोलणे एजे ऐकतात. एजेंना पाहून यशला मोठा धक्काच बसतो. पुढे लीला अपघातानंतर घरी जाते. तिला वाटतं की तिच्या स्वागतासाठी घरातील सगळे तयारी करुन असतील. पण तसं काहीच होत नाही. यावेळी एजेंची आईदेखील तिच्या बरोबर नीट वागत नाहीत.
आणखी वाचा – तितीक्षा तावडेचा नवा विक्रम, युट्यूबकडून अभिनेत्रीचा सन्मान, म्हणाली, “२०२३मध्ये चॅनल सुरु केलं आणि…”
त्यामुळे आता एजेंना रेवतीच्या प्रेमाची जाणीव झाल्यामुळे ते यश व रेवतीचे लग्न लावणार का? यश-रेवतीच्या प्रेमामुळे लीला व एजे यांच्या नात्यावर काही परिणाम होणार का? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे आता यश-रेवती यांच्यातील प्रेम टिकणार की नाही? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहता येणार आहे.