बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासू मल्लिका मनोरंजन सृष्टिपासून दूर असलेली बघायला मिळाली. मात्र वयाच्या ४८ व्या वर्षी तिने त्याच जोमात पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करताना दिसून आली. गेल्या काही वर्षांपासून ती दिल्ली, मुंबई व लॉस एंजेलिस या ठिकाणी फिरताना दिसून येत आहे. तिने एका मुलाखतीमध्ये तिने बोटॉक्स व अफेअर व ब्रेकअप संदर्भात खुलेपणाने भाष्य केले आहे. ती यावेळी म्हणाली की एक योग्य व्यक्ती मिळणे खूप कठीण आहे. तसेच तिने अजून या सगळ्यावर काय भाष्य केले? याबद्दलही जाणून घेऊया. (mallika sherawat on relationship)
मल्लिकाने ‘इटाइम्स’बरोबर संवाद साधला. यावेळी सगळ्या मिथ्य मोडायची असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली की, “बॉलिवूडमध्ये तारुण्यपणात जी अभिनेत्री खूप नाव कमावते तिला नंतर संधी मिळत नाही. ती गायब होऊन जाते. त्याबद्दलच मला बोलायचे आहे. २० वर्षांपेक्षा अधिक वर्ष उलटून गेली आहेत पण मी अजूनही दिग्दर्शकांच्या लेखन शैलीच्या पठडीत बसत नाही. मल्लिका चांगली नाही असं जे म्हणतात त्यांची विचार करण्याची क्षमातच चांगली नाही. कारण मी होते, आहे आणि राहणार”.
आणखी वाचा – यशने रेवतीला दिली प्रेमाची कबुली, एजेंसमोर सत्य येणार का?, लीलाचा पाठिंब कायम पण…
पुढे ती म्हणाली की, “मी कोणतीही प्लॅस्टिक सर्जरी केली नाही आणि बॉटॉक्सदेखील केले नाही. मी ‘मर्डर’ चित्रपटात जशी दिसायचे तशीच मी आताही दिसत आहे. मी अत्यंत काटेकोरपणे आयुष्य जगते. वेळेवर झोपते. दारु-सिगारेट पित नाही. लोक काय म्हणतील? याचा विचार मी करत नाही. ज्यांच्या डोक्यात आता प्रसिद्धीची हवा गेली आहे उद्या त्यांनी मला २० वर्षांनी पाहिलं तरीही मी आता जशी आहे तशीच मी त्यांना दिसेन”.
मल्लिकाने तिच्या रिलेशनशिपवरदेखील भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “मी सध्या सिंगल आहे. सध्याच्या काळात हवा तसा व्यक्ती शोधणं खूप कठीण आहे”. मल्लिका आधी सीरिल ऑक्सेनफॅन्सला डेट करत होती. मात्र त्यांचा आत ब्रेकअप झाला आहे.