Rahul Vaidya New Home : अनेक कलाकार मंडळी सध्या त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश करतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेक कलाकार मंडळी त्यांच्या आलिशान घराचे फोटो नेहमीच शेअर करताना दिसतात. अशातच लोकप्रिय गायक व रिॲलिटी शोमध्ये दिसलेल्या राहुल वैद्यने नुकतेच मुंबईत ९ कोटी रुपयांचे अपार्टमेंट खरेदी केले असल्याचं समोर आलं आहे. स्क्वेअर यार्डच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. राहुलने नवीन खरेदी केलेले अपार्टमेंट डीएलएच सिग्नेचरमध्ये आहे, जो वांद्रे पश्चिम येथील डीएलएच ग्रुपचा प्रीमियम प्रकल्प आहे. १.२५ एकरमध्ये पसरलेल्या या संकुलात विविध सुविधा आहेत.
स्क्वेअर यार्ड्सनुसार, राहुल वैद्य यांनी खरेदी केलेले अपार्टमेंट अंदाजे ३,११० स्क्वेअर फूट (२८८.९२ स्क्वेअर मीटर) कार्पेट एरिया आणि ३१७.९३ स्क्वेअर मीटर (३,४२२ स्क्वेअर फूट) च्या बिल्ट-अप एरियामध्ये पसरलेले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये अंतिम झालेल्या व्यवहारात ५६.३७ लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क समाविष्ट आहे.
आणखी वाचा – दोन वर्षांची झाली आलिया-रणबीर यांची लेक, बॉलिवूडकडून सेलिब्रेशन, Unseen Photos व्हायरल
अलीकडेच राहुल वैद्यच्या मुलीचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये ती पहिल्यांदाच चालताना दिसत होती आणि यावेळी गायिकेची आई तिथे उपस्थित होती. राहुल वैद्य ‘इंडियन आयडॉल सीझन १ चा उपविजेता ठरला होता. त्याने ‘बिग बॉस १४’ मध्येही सहभाग घेतला होता. या सीझनमध्ये तो उपविजेता ठरला. याशिवाय तो नुकताच ‘लाफ्टर शेफ’मध्ये दिसला होता. जिथे त्याची जोडी अली गोनीबरोबर होती.
राहुल वैद्य यांनी ऑगस्ट महिन्यात सुमारे २ कोटी रुपयांची रेंज रोव्हर कार खरेदी केली होती. मिका सिंग, जन्नत जुबेर, अमित टंडन, अली गोनी आदींनीही त्यांचे अभिनंदन केले. पत्नी दिशा परमार हिने याबाबत त्याचा अभिमान व्यक्त केला. याशिवाय त्याच्याकडे ऑडी आणि मर्सिडीज सारख्या कारचे कलेक्शन आहे. आणि आता त्याने ९ कोटी रुपयांचे घर विकत घेतले असल्याचे समोर आले आहे. यामुळे राहुलच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण पसरलेले पाहायला मिळत आहे.