झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेत एकामागून एक नवनवीन ट्विस्ट येतच असतात. मालिकेत सध्या रेवती व यशच्या लग्नाची लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एजे व लीलाने अनेक प्रयत्न करुन रेवती व यशचे लग्न ठरवले आहे. यश व रेवती एकमेकांच्या प्रेमात पडले. यशची बहीण दुर्गाला हे लग्न मान्य नव्हते. तिने या लग्नाला विरोध केला होता. पण लीला व एजेने त्यांचे लग्न व्हावे, यासाठी अनेक प्रयत्न केले असल्याचे पाहायला मिळाले. अखेरीस त्यांचे लग्न पार पडणार असल्याचे दिसत आहे. (Navri Mile Hitlerla serial update)
यश-रेवतीचे लग्न हे लीलाच्या घरी साधेपणाने होणार असल्याचे एजेने जाहीर केले आहे. त्यामुळे आता लीलाच्या माहेरी लग्नाची गडबड सुरु असल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. एकीकडे यश-रेवती यांची लगीनघाई सुरु आहे तर दुसरीकडे लीला-एजे यांच्यातीळ प्रेमही बहरतानाचे पाहायला मिळत आहे. मात्र या लग्नात आता नवं संकट येणार आहे. यश-रेवतीच्या लग्नाच्या मंडपात अचानक विक्रांतची एन्ट्री होणार आहे. या नवीन ट्विस्टचा प्रोमो समोर आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये रेवतीच्या गळयात हार घालत असताना एजे ज्या व्यक्तीला अडवतात तो यश नसून विक्रांत असतो. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसतो. एजेंना विक्रांतचा संशय आल्याने ते हे लग्न मध्येच रोखतात. यावर विक्रांतही “काहीही झालं तरी माझं आणि रेवतीचं लग्न होणारच. आता तुला कुणीही वाचवू शकणार नाही, एजे सुद्धा नाही”. यानंतर विक्रांत बंदूक काढतो आणि एजेच्या दिशेने बंदूक रोखतो. तसंच तो बंदुकीतून गोळीही झाडतो. गोळीचा आवाज ऐकताच सगळेजण घाबरतात.
आणखी वाचा – Video : प्रचंड वेदना असतानाही सोनू निगमने केला शो, गायकाला चालताही येईना अन्…; व्हिडीओ व्हायरल
त्यामुळे आता विक्रांतने नक्की कुणावर बंदूक झाडली असेल? यातून कुणी जखमी झाले असेल का? विक्रांतने निर्णय घेतल्याप्रमाणेतो रेवतीशी लग्न करणार का? तसंच एजेमुळे रेवतीच्या लग्नातील अनर्थ टळणार का? हे मालिकेच्या आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.