जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली होती आणि आता सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना या नाटकाची पर्वणी पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकाच्या नुकत्याच पार पडलेल्या एका प्रयोगादरम्यान रसिकांना वेगळाच अनुभव आला. हा अनुभव म्हणजे नाटक रंगात आलं असताना एका प्रवेशानंतर अभिनेते शरद पोंक्षे अचानक सर्वकाही विसरले, स्तब्ध झाले आणि थांबले. रसिकप्रेक्षकांनी नाट्यगृह गच्च भरलेलं असताना मंचावर असलेले पोंक्षे सर्वकाही विसरून गेले. (sharmila shinde on sharad ponkshe forgotten video)
आतापर्यंतच्या त्यांच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हे असं झाल्यामुळे पोंक्षेंनाही यावेळी गहिवरुन आलं होतं. यामुळे त्यांनी प्रेक्षकांची माफी मागितली. यावेळी शरद पोंक्षेंना अश्रु अनावर झाले. पुढे प्रयोग रद्द झाल्याचंही घोषित केलं गेलं. पण या घटनेनंतर उपस्थित प्रेक्षकांमध्ये नाराजी किंवा तक्रारीचा सूर जाणवला नाही. तसंच या घटनेनंतर अनेक कलाकारांनीही त्यांना पाठींबा दिला. अशातच ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्री शर्मिला शिंदेनेही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने शरद पोंक्षेंबद्दल घडलेल्या या संपूर्ण प्रकरणावर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी तिच्याही डोळ्यात अश्रु दाटले.
आणखी वाचा – अल्लू अर्जुनला कोर्टाकडून मोठा दिलासा, संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेत्याला जामीन
याबद्दल शर्मिला असं म्हणाली की, “खरं सांगू का? माझ्याकडे शब्द नाहीत. तो व्हिडीओ बघून मी फक्त रडले. मला असं झालं की, ठीक आहे सर तुम्ही खूप मोठे कलाकार आहात आणि आम्ही तुम्हाला बघून मोठे झालो आहोत. कलाकार असलात तरी तुम्ही एक माणूसही आहात. तर शरद पोंक्षेंबरोबर जे काही झालं ते होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका. प्रेक्षक आणि सगळेच तुमच्याबरोबर आहेत. तुम्ही कमाल आहात आणि यापुढेही कमालच करणार आहात. एका प्रयोगामुळे तुम्ही अजिबातच खचुन जाऊ नका. तुम्ही उत्कृष्ट आहात आणि तुम्ही कायमच उत्कृष्ट असणार आहात”.
आणखी वाचा – अभिषेक-ऐश्वर्या पुन्हा दिसले एकत्र, नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करुन भारतात परतले, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
यापुढे तिने असं म्हटलं की, “एवढी मोठी फाईट करुन तुम्ही इथपर्यंत आला आहात. कॅन्सरसारख्या आजाराशी यशस्वी लढा देऊन तुम्ही इथपर्यंत आला आहात. शेवटी माणसाचं शरीर आहे. त्यामुळे कुठे तरी, काही तरी राहतच असेल. माणसाला त्रास होतच असेल आणि त्यामुळेच काही तरी झालं असेल. यामुळे तुम्ही स्टेजवर रडलात, यातच तुमचा मोठेपणा दिसून येतो. त्यात तुम्ही स्टेजवर थांबतो म्हणत माफीही मागितली. तुम्ही ते मान्य केलं आणि एवढ्या प्रेक्षकांसमोर रडून माफी मागितली. यातच तुमचा मोठेपणा आहे. त्यामुळे हे अगदीच ठीक आहे. त्यात चुकीचं असं काहीच नव्हतं. हे होऊ शकतं”.