अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता जवळपास महिना झाला आहे. पण तरीही या चित्रपटाची व अभिनेता अल्लू अर्जुनची चर्चा अजूनही कमी झालेली नाही. त्यात ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरला झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली. ०४ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २’च्या प्रीमियरला उपस्थित असताना एक दुर्दैवी घटना घडली. ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला. (Allu Arjun Granted Bail)
प्रीमियरला अचानक पोहोचलेल्या अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली आणि ही गर्दी इतकी वाढली की, चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे रेवती नावाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर यात तिचा दहा वर्षांचा मुलगा जखमी झाला. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आल्याचे अभिनेत्याने सांगितले होते. मात्र पोलिसांनी असं काहीच न झाल्याचे सांगितले होते. तसंच पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही जारी केले होते.
आणखी वाचा – जहागीरदारांच्या घरी नव्या पाहुणीची एन्ट्री, एजे-लीलाच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट, कोण असेल ‘ही’ व्यक्ती?
दरम्यान, या घटनेप्रकरणी अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याला याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आणि ५० हजार रुपयांच्या जामीन जातमुचलक्यावर त्याची सुटका केली. रेवतीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे, अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच जखमी मुलाच्या उपचारासाठी २ कोटी रुपये मदत म्हणून दिले.
आणखी वाचा – 04 January Horoscope : सिद्धी योगाचा शुभ योगामुळे मकर राशीसह ‘या’ राशींना होणार आर्थिक फायदा, जाणून घ्या…
२४ डिसेंबर रोजी जखमी मुलाचे वडील भास्कर यांनी सांगितले की, २० दिवसांच्या काळजीनंतर त्यांचा मुलगा प्रतिसाद देऊ लागला आहे. त्यांनी अल्लू अर्जुन आणि तेलंगणा सरकारच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. दुसऱ्या दिवशी, २५ डिसेंबर रोजी, चित्रपट निर्माता आणि अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी जखमी बालक श्री तेज आणि त्याच्या कुटुंबासाठी ०२ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य जाहीर केले.