शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navri Mile Hitlerla : लीलाने मोडला यश-श्वेताचा साखरपुडा, वेश बदलून आली अन्…; एजेही देणार रेवतीची साथ, मालिकेत नवीन ट्विस्ट

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 24, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla Marathi serial update new promo Leela broke Yash and Shweta engagement by changing her look

नवरी मिळे हिटलरला मालिकेत नवीन ट्विस्ट लीलाने वेश बदलून यश व श्वेता यांचा साखरपुडा मोडला, जाणून घ्या...

‘नवरी मिळे हिटलरला’ ही झी मराठीवरील मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला तो म्हणजे यशच्या लग्नाचा. लीलाने रेवतीला तिचे लग्न यशबरोबर लावून देणार असल्याचे वचन दिलं आहे. पण एजेंच्या मनात काही वेगळंच आहे. श्वेताचे एजेंबरोबर लग्न ठरले होते, पण काही कारणांमुळे लीलाचे लग्न एजेंबरोबर होते. त्यामुळे आता एजे श्वेताबरोबर यशचे लग्न लावणार आहे. मात्र, दुर्गाच्या दबावामुळे यश आणि रेवती एजेला खरे सांगत नाहीत. आता मात्र मालिकेत ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. (Navri Mile Hitlerla Serial Updates)

एजेंना रेवतीच्या खऱ्या प्रेमाची जाणीव होणार असून ते रेवतीला तुझ्यामुळे मी माझा शब्द मागे घेत असल्याचे सांगतात. ‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला रेवती दवाखान्यात असून एजे तिला भेटायला गेला आहे. रेवती रडत असून, “जे तू मला सांगितलं नाहीस, ते तुझ्या अश्रूंनी मला सांगितलं” असे एजे तिला म्हणून तिचे अश्रू पुसतो. तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो, “तुझ्यापुढे माझा शब्द, माझं प्रॉमिस, सगळ्याची व्हॅल्यू झिरो आहे”. तर दुसरीकडे लीला यश व श्वेता यांचा साखरपुडा मोडण्यासाठी वेश बदलून जाते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – The Great Indian Kapil Show मध्ये आठ वर्षांनी गोविंदा व कृष्णा अभिषेक पुन्हा एकत्र, अखेर कौटुंबिक वाद मिटले?

यश आणि श्वेताचा साखरपुडा चालू असताना गुरुजी सांगतात, “आता दोघांनी एकमेकांना अंगठ्या घाला”. तितक्यात लीला वेश बदलून येते आणि “थांबा”, असे म्हणते. त्यानंतर ती कसला तरी धूर करते. मग सर्वांच्या लक्षात येते की, यश जागेवर नाही. तेव्हा लक्ष्मी दुर्गाला म्हणते, “वहिनी यश कुठे आहे?” त्यानंतर दुर्गा यशला हाक मारते. त्यामुळे एकीकडे एजेंनी रेवतीच्या प्रेमाची जाणीव झाली आहे तर दुसरीकडे लीला यशला घेऊन गायब झाल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, राज ठाकरेंचा फोटो शेअर करत म्हणाली, “आमचा राजा नाही, महाराष्ट्र…”

त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार? यांची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. एजेंना रेवतीच्या प्रेमाची जाणीव झाल्यामुळे ते यश व रेवतीचे लग्न लावणार का? की लीला यशला घेऊन गायब झाल्यानंतर ती काही वेगळी खेळी खेळणार? आणि ही  सत्य समजल्यानंतर एजे आणि लीला एकत्र येणार का? हे आगामी भागांममधून पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: Navri Mile Hitlerla Marathi SerialNavri Mile Hitlerla Marathi Serial UpdatesNavri Mile Hitlerla Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
अप्पी आमची कलेक्टर मालिकेतील अमोलच्या आजारपण तिसऱ्या स्टेजला, प्रेक्षकांनी या कथानकावर व्यक्त केली नाराजी

Appi Amchi Collector : अमोलचा आजार तिसऱ्या स्टेजला, मलिकेचा नवीन कथानकावर प्रेक्षक नाराज, म्हणाले, “इतक्या लहान मुलाला...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.