शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बहिणीचा जीव वाचवण्यासाठी लीलाने एजेंशी केलं लग्न, घरात आल्यानंतर सूना कशा वागवणार? मोठा ट्विस्ट

Saurabh Moreby Saurabh More
जून 3, 2024 | 11:01 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla marathi serial update Leela decides marry with AJ to save her sister

बहिणीचा जीव वाचवण्यासाठी लीलाने एजेंशी केलं लग्न, घरात आल्यानंतर सूना कशा वागवणार? मोठा ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील एजे व लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडतेय. एजे व लीला ही एकमेकांच्या विरोधी स्वभावाची जोडी एकत्र येईल का, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

अशातच मालिकेच्या नवीन प्रोमोने लक्ष वेधून घेतल आहे. मालिकेत सध्या अभिराम व श्वेता यांच्या लग्नाचे कथानक सुरु आहे. अशातच आता अभिराम व श्वेताऐवजी अभिराम व लीला यांचे लग्न होणार असल्याच्या ट्विस्टचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. मालिकेत एजे व लीला यांच्या लग्नाचा ट्विस्टचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. यावेळी लीलाच्या बहिणीला किडनॅप करण्यात आल्याचे कळले होते. याबद्दलचाच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by नवरी मिळे हिटलरला (@navarimilehittlerla)

आणखी वाचा – मुलगा झाला हो! ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेता झाला बाबा, बाळासह क्यूट फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

एजेच्या लग्नात विक्रांत देशमुख एका ज्यूसमध्ये गुंगीचे औषध टाकून ते लीलाच्या बहिणीला देतो. ज्यामुळे ती बेशुद्ध पडते. तिच्या बेशुद्ध पडल्यानंतर विक्रांत तिला किडनॅप करून लीला फोन करतो व तिला एका श्रीमंत माणसाशी लग्न करायला सांगतो. यावर लीला “मी कुणाशी लग्न करु” असं म्हणते. यावर विक्रांत तिला एजेशी लग्न करण्याचे सुचवतो. तू जर एजेशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन” असं म्हणतो. त्यामुळे ती एजेबरोबर लग्न करायला तयार होते.

आणखी वाचा – कर्क, सिंह व धनु राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस चांगला, सर्व इच्छा होतील पूर्ण, तुमच्यासाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या…

दरम्यान, गेले काही दिवस लीला व एजेंच्या यांच्या लग्नाविषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. याआधी लीलाने मेहंदी सोहळ्यातून पळ काढला होता. दिल्या वचनाला लीला जागली नसल्यामुळे आता अभिराम देखील तिच्यावर चिडला होता.  त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात काय पाहायला मिळणार?, एजे व लीला यांचे लग्न खरंच होणार की? यात आणखी काय नवीन तवसीत येणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsNavri Mile Hitlerla
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sanjeeda Shaikh Incident

"तिने माझ्या स्तनाला स्पर्श केला अन्…", 'हिरामंडी' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीला नाईट क्लबमध्ये मुलीकडूनच घाणेरडी वागणूक, म्हणाली, "धक्का बसला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.