झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत नुकताच एजे व श्वेता यांच्या लग्नाचे कथानक सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मात्र एजे व श्वेताऐवजी एजे व लीला यांचे लग्न होणार असल्याच्या ट्विस्टने मालिकेत चांगलीच रंगत आणली.
अशातच आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये एजेला त्याचं लग्न श्वेताऐवजी लीलाशी झालेले कळत आहे. त्यामुळे तो तिच्यावर भयंकर चिडल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय लीला तिला तिच्या बहिणीच्या काळजीपोटी एजेशी लग्न करावे लागले असल्याचे समजावून सांगते. मात्र एजेला लीलावर विश्व बसत नाही. त्यामुळे एजे लीलाला तने त्याचा विश्वासघात केल्याचे बोलतात. तसेच यावेळी एजे लीलाला “माझी चूक झाली की मी तुझ्यावर विश्वास ठेवला” असं म्हणतात.

या प्रोमोवर प्रेक्षकांनी आपल्या अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने कमेंट करत “सगळे लीलाला बिचारी म्हणतात. ती आहेच पण एजेही बिचारा आहे. आधी त्याला लग्नाचं करायचं नव्हतं, नंतर पहिल्या बायकोच्या शेवटच्या इच्छेने आणि आईसाठी त्याला लग्न करावं लागलं. पण मग जिच्याशी लग्न करायचं ठरलं, तिला करायचं नव्हतं, आता तडजोड म्हणून श्वेताशी लग्न ठरवलं तर परत आयुष्यात लीलाच आली.” तर आणखी एकाने “तशी त्या एजेशी श्वेताचं काहीच बोलणं किवा दोघांमध्ये काहीच संवाद होत नव्हता. ते लीला एजे एकमेकांना ओळखतात, त्यांच्यात छान मैत्रीही आहे मग त्यांचं लग्न झालं तर काय हरकत आहे” असं म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रोमोवर नेटकऱ्यांनी अनेक संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी लीलासाठी वाईट वाटतं असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या लग्नावरुन मालिकेच्या निर्मात्यांना व दिग्दर्शकाला ट्रोलही केलं आहे. मालिकेत लीला एजे यांच्या लग्नानंतर पुढे काय पाहायला मिळणार? यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.