बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर प्रियांका अनेक हिंदी तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर तिने आपला मोर्चा हॉलिवूड चित्रपटांकडे वळवला आहे. सध्या ती लॉस एंजलिस येथे कुटुंबाबरोबर स्थायिक झालेली दिसून येत आहे. मात्र तिच्यावर एकदा अशी वेळ आली ज्यामुळे तिला सगळ्याच चित्रपटांमधून काढून टाकलं होतं. त्यामुळे ती तिची अभिनेत्री होण्याची स्वप्न मागे टाकून पुन्हा बरेलीमध्ये जाण्याच्या तयारीत होती. मात्र त्यावेळी तिला आशा एका दिग्दर्शकाने साथ दिली ज्यामुळे प्रियांकाच्या करियरला कलाटणी मिळाली. नंतर प्रियांकाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. (anil sharma on priyanka chopra )
प्रियांका अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी नाकावर शस्त्रक्रिया केली होती. मात्र ही शस्त्रक्रिया फसल्याने तिला अनेक चित्रपटांमधून काढण्यात आले होते. मात्र अनिल शर्मा या दिग्दर्शकाने प्रियांकाला संधी देण्याचे ठरवले. ‘द हीरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ या चित्रपटांमध्ये अनिल यांनी काम करण्याची संधी दिली. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. अनिल यांनी सिद्धार्थ कननबरोबर संवाद साधताना म्हणाले की, “मी जेव्हा प्रियांकाच्या नाकाच्या शस्त्रक्रियेबद्दल ऐकले तेव्हा वाटलं की कदाचित जुलिया रॉबर्ट सारखं दिसावं म्हणून केली असावी. त्यावरुन मी तिला ओरडलोदेखील होतो. नंतर ही सगळे मेडिकल इश्यूमुळे असल्याचे समजले आणि त्या कारणामुळे तिची शस्त्रक्रिया बिघडल्याचे सांगितले”.
पुढे ते म्हणाले की, “प्रियांका ‘द हीरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ चित्रपटासाठी पाच लाख रुपये घेतलेले टोकन परत करण्यासाठी आली होती. तिने सांगितले की चित्रपटातून काढून टाकले आहे आणि पुन्हा बरेलीला जात आहे. तिच्या वडिलांनी आर्मीमध्ये पुन्हा काम सुरु केले आणि आईने डॉक्टरची प्रॅक्टिस पुन्हा एकदा सुरु करण्याचे ठरवले आहे”.
नंतर ते म्हणाले की, “मी नंतर तिला बरेलीला जाण्यापासून थांबवलं आणि YRF च्या मेकअप आर्टिस्टला बोलावलं. तिच्या चेहऱ्यासंबंधित सर्व माहिती दिली. नंतर तिच्या चेहऱ्यावर काम केले आणि ती स्क्रीनसाठी पूर्ण तयार झाली. तिच्या नाकाची शस्त्रक्रिया बिघडली यामध्ये तिची काहीच चूक नव्हती”. दरम्यान या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.