शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नशिबाने अशी पलटी मारली की…”, लीला-ऐजेचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, म्हणाला, “लीला दिसते बरी पण…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 31, 2024 | 1:25 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Navri Mile Hitlerla fame AJ and Leela took ukhana

"नशिबाने अशी पलटी मारली की...", लीला-ऐजेचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, म्हणाला, "लीला दिसते बरी पण..."

लग्न म्हटलं की या यातील मुख्य विधी असतो, तो म्हणजे ‘केळवण’. लग्नाच्या आधी नातेवाईक व मित्र परिवाराकडून नव दाम्पत्यासाठी केळवणाचे आयोजन केले जाते. नुकतेच असेच एक केळवण पार पडले असून या केळवणाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या आपल्या लाडक्या जोड्या म्हणजेच एजे-लीला, आकाश-वसुंधरा, आशु-शिवा आणि पारू-आदित्य या जोड्या आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आता मालिकांमध्ये लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. दरम्यान, नुकताच या जोड्यांचा केळवण सोहळा पार पडला.

या केळवण सोहळ्यात प्रत्येकाने आपल्या जोडीदारासाठी खास उखाणा घेतला. यावेळी लीलाने एजेसाठी घेतलेल्या खास उखाण्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मालिकेत सध्या एजे व लीला यांच्यात लग्न होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच या केळवणात लीलाने एजेसाठी उखाणा घेतला आहे. लीलाने एजेच्या नावाचा उल्लेख करत खास उखाणा घेतला.

आणखी वाचा – “इंग्रजी भाषा बोलता येत नाही अन्…”, ‘कान्स’मध्ये जाऊन छाया कदमांनी मराठी भाषेतच साधला संवाद, म्हणाल्या, “तिथल्या लोकांबरोबर…”

यावेळी ती असं म्हणाली की, “बनायचं होतं हिरोईन आणि शाहरुख व सलमानबरोबर करायचं होतं काम, पण नशिबाने अशी पलटी मारली की, पदरात पडला अभिराम”. तिच्या या उखाण्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या जयघोषात तिचे कौतुक केले. यानंतर अभिराम म्हणजेच एजेनेही उपस्थित स्त्रियांच्या मदतीने लीलासाठी उखाणा घेतला. अभिरामने लीलासाठी खास उखाणा घेत असं म्हटलं की, “चांदीच्या परातीला सोन्याची करी, लीला दिसते बरी, पण माझ्या कुटुंबाला सांभाळेल तेव्हा खरी”. एजेच्या या उखाण्यावरही उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्याच्या उखण्याचे कौतुक केले.  

आणखी वाचा –  देवीआईच्या लेकींच्या हाती पाचवी पेटी, पेटीमध्ये विरोचकाला मारण्याचे ‘ते’ शस्त्र, अखेर रुपालीचा अंत होणार

दरम्यान, आता छोट्या पडद्यावरील या लाडक्या जोड्यांच्या आयुष्यात अनेक ट्विस्टदेखील येणार आहेत. एकीकडे अभिरामचं लग्न श्वेताशी होतानाचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, वसू-आकाशच्या लग्नात एक मोठं सत्य लपवलं गेलं आहे. आशु-शिवाबरोबरच पारू-आदित्य जोडीमध्येदेखील काही क्लेश निर्माण होणार आहेत. त्यामुळे मालिकांमधील हे रंजक वळण आता येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsNavri Mile Hitlerla
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi actress Supriya Pathare shared a video about traffic in Thane-Ghodbunder road.

पाच तास एकाच जागी, खाण्या-पिण्याचे हाल अन्...; घोडबंदरला ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर सुप्रिया पाठारेंचे हाल, म्हणाल्या, "आठ वाजल्यापासून..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.