बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“इंग्रजी भाषा बोलता येत नाही अन्…”, ‘कान्स’मध्ये जाऊन छाया कदमांनी मराठी भाषेतच साधला संवाद, म्हणाल्या, “तिथल्या लोकांबरोबर…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 31, 2024 | 12:13 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actress Chhaya Kadam talked on her inability to speak fluent English at the Cannes Film Festival.

"इंग्रजी भाषा बोलता येत नाही अन्...", 'कान्स'मध्ये जाऊन छाया कदमांनी मराठी भाषेतच साधला संवाद, म्हणाल्या, "तिथल्या लोकांबरोबर..."

इंग्रजी भाषा बोलता न येणे आणि यामुळे न्यूनगंड येणे हे प्रत्येक मराठी माणसाबरोबर होतंच. पण तरीही इंग्रजी भाषा बोलता न येण्याचा न्यूनगंड अजिबात न बाळगता केवळ आपल्या अभिनयाच्या हिंमतीवर एका अभिनेत्रीने हॉलिवूडमध्ये आपली मराठी पताका फडकावली आहे आणि ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे छाया कदम. ‘फॅंड्री’, ‘सैराट’, ‘न्युड’, ‘रेडू’, ‘सरला एक कोटी’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसह ‘झुंड’ व ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘लापता लेडीज’ अशा बॉलीवूड चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या अभिनयाची ‘छाया’ सर्वांवर पाडली आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या छाया कदम नुकत्याच त्यांच्या ‘कान्स’मधील गौरवाने पुन्हा एकदा चर्चेत आल्या.

यंदाच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तब्बल तीन दशकांनी ‘All We Imagine As Light’ या भारतीय चित्रपटाला नामांकन मिळालं. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीत पाल्मे डी’ओर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या या चित्रपटाचा कान्स चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला आणि त्यांच्या ‘All We Imagine As Light’ या चित्रपटाचा प्रीमियर संपल्यानंतर उपस्थितांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी अभिनेत्रीचे कौतुक केले. या कान्स फेस्टिव्हलनंतर छाया कदम यांनी पहिल्यांदाच ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला.   

आणखी वाचा – शुक्रवारी मेष व कुंभसह ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, तुमच्यासाठी दिवस नेमका कसा?, जाणून घ्या…

यावेळी त्यांना इंग्रजी भाषा बोलता न येण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत छाया कदम यांनी असं म्हटलं की, “मला आधीपासूनच इंग्रजीची भीती होती. पण आता मला असं वाटतं की, मला नाही येत इंग्रजी भाषा बोलता तर ठीक आहे. मला माझं काम इथपर्यंत घेऊन आलं आहे.  मला किती छान इंग्रजी बोलता येतं यासाठी मला कान्समध्ये बोलावलं नसून मला माझ्या कामासाठी व माझ्या चित्रपटासाठी इथं बोलावलं गेलं आहे. तरीही मी तिथे जाऊन तोडकं मोडकं इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचे. पण ते लोकंही फ्रेंच भाषा बोलतात तर त्यांनाही इंग्रजी बोलता येत नव्हतं. तर मी त्यांना गंमतीने You Don’t know English (तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही) असं म्हणायचे.       

आणखी वाचा – देवीआईच्या लेकींच्या हाती पाचवी पेटी, पेटीमध्ये विरोचकाला मारण्याचे ‘ते’ शस्त्र, अखेर रुपालीचा अंत होणार  

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मला आता या कान्स फेस्टिव्हलनंतर आत्मविश्वास आला आहे. माज नाही म्हणता येणार पण स्वत:बद्दल आत्मविश्वास वाटत आहे. मी तिथल्या लोकांबरोबर हिंदी काय तर मराठीत पण बोलायचे. मला इंग्रजी भाषा नाही बोलता येत संपला विषय. तुम्हाला समजून घ्यायचे आहे तर तुम्ही समजून घ्या.  

Tags: chhaya kadamChhaya Kadam Cannes Film Festivalmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Anant ambani and radhika merchant Pre Wedding

अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करणार शकीरा, अंबानी कुटुंबियांनी दिले आहेत तब्बल इतके रुपये अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.