‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मालिकेत येणाऱ्या अनेक रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत आहे. या मालिकेत राकेश बापट हा एजे म्हणजे अभिराम जहागीरदार व वल्लरी लोंढे ही लीलाची भूमिका साकारत आहे. नुकतंच मालिकेत एजे व लीला यांचे मनाविरुद्ध लग्न झालं आहे आणि मनाविरुद्ध झालेल्या एजे व लीला यांच्या लग्नामुळे त्यांच्यातील प्रेमकहाणी आता कोणतं वळण घेणार? याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. एजे व लीला हे दोघे मालिकेत एकमेकांच्या विरुद्ध असले, तरी ते पडद्यामागे खूपच मजामस्ती करतात.
एजे व लीला म्हणजेच अभिनेता राकेश बापट व वल्लरी लोंढे हे दोघेही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात आणि ते अनेकदा त्यांचे पडद्यामागील काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्यांची ही पडद्यामागची मजामस्ती चाहत्यांनाही चांगलीच आवडते. अशातच त्यांनी नुकतेच त्यांचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि हे फोटो त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. लीलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे दोघांचे मालिकेमधील लूकचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यामधील पहिला फोटो हा त्यांचा लुक टेस्टचा आहे तर दूसरा फोटो हा त्यांच्या शंभर भागांबद्दलचा आहे.
लीला फेम वल्लरीने शेअर केलेल्या या खास फोटोने तिच्या व मालिकेच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. लीलाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला असून त्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी घेतली आहे. तर एजे म्हणजेच राकेश बापटने मरुन रंगाचा सूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
आणखी वाचा – देशमुखांच्या सूनेचा परदेशात अनवाणी प्रवास, रस्त्यावरुन फिरताना दिसली अन्…; व्हिडीओ व्हायरल
तर लीलाने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी व एजेने काळ्या रंगाचा सूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. “लूक टेस्ट ते शंभर भाग” असं म्हणत तिने हे खास फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, त्यांचे हे फोटो चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे. “बेस्ट मालिका, बेस्ट जोडी, खूप छान, खूपच सुंदर दिसत आहात, तुमची मालिका आवडते” अशा अनेक कमेंट्स करत एजे-लीलाच्या चाहत्यांनी या फोटोला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.