शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हृता दुर्गुळेचे वेबविश्वात पदार्पण, ‘मन उडू उडू झालं’ फेम ‘या’ अभिनेत्यासह पुन्हा एकदा एकत्र करणार काम, अभिनेत्यानेच दिली माहिती

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 2, 2024 | 12:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Man Udu Udu Jhala fame Hruta Durgule and Ruturaj Phadke worked together in the web series Commander Karan Saxena

हृता दुर्गुळेचे वेबविश्वात पदार्पण, 'मन उडू उडू झालं' फेम 'या' अभिनेत्यासह पुन्हा एकदा एकत्र करणार काम, अभिनेत्यानेच दिली माहिती

‘दूर्वा’, ‘फुलपाखरु’ व ‘मन उडू उडू झालं’ अशा मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. हृताने आजवर अनेक मराठी मालिका व चित्रपटांत काम केल्यानंतर ती आता हिंदीत पदार्पण करायला सज्ज झाली आहे. हृता ही लवकरच हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘कमांडर करण सक्सेना’ या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच हृताने या वेब सीरिजचा टीझर शेअर केला होता. त्यानंतर तिने या सीरिजबद्दल सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे तिने तिचा आनंद व्यक्त केला होता.

हृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही खास फोटो शेअर केले होते. या पोस्टमध्ये तिने “माझे जीवन हे अनेक पहिल्या गोष्टींनी भरलेले आहे आणि त्याच पहिल्या गोष्टींमध्ये ही सीरिज येते. त्यामुळे ही सीरिज माझ्यासाठी एक उल्लेखनीय कामगिरी आहे. या सीरिजमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना माझा पहिलाच अनुभव आहे. तसेच ॲक्शन सीक्वेन्सचाही माझा पहिला अनुभव आणि या सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे हिंदी OTT जगात पदार्पण होत आहे. याशिवाय चांगली सुरुवात कुठली असू शकत नाही” असं म्हटलं.

View this post on Instagram

A post shared by Ruturaj Phadke (@ruturajphadke)

आणखी वाचा – “आमच्या बाबतीत हे घडलं असलं तरी…”, दोन लग्न करण्यावर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे भाष्य, म्हणाली, “चुकीचा निर्णय…”

अशातच या सीरिजमधील आणखी एक अभिनेता व हृताचा सहअभिनेता ऋतुराज फडकेनेही या सीरिजबद्दलची एक खास पोस्ट शेअर केली आहे. ऋतुराजने त्याच्या इन्स्टाग्राम हृताबरोबरचा खास फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “मन उडू उडू झालं ही मालिका आम्ही जवळ जवळ एक वर्ष केली. पण त्यामध्ये आमच्या दोघांचा एक ही असा एकत्र सीन नव्हता. मात्र या हिंदी वेबसीरिजमध्ये एकत्र सीन आहे. या सीरिजमध्ये हृताने एकत्र कमाल काम केले आहे. मग ते अॅक्शन असो, भले मोठे हिंदीमधले डायलॉग असो. कमाल काम केलं आहे. ‘कमांडो करण सक्सेना’ ही वेबसिरीज बघायला तुम्हाला वेगळीच मज्जा येईल”.

आणखी वाचा – सलमान खान गोळीबाराचे बिश्नोई कनेक्शन, मारण्यासाठी थेट पाकिस्तानातून मागवली होती शस्त्रे अन्…; नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत ऋतुराज व हृता एकत्र झळकले होते. ऋतुराज फडकेने या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या इंद्राच्या भावाची भूमिका साकारली होती. या नकारात्मक भूमिकेला ऋतुराजने उत्तम न्याय दिला होता. या मालिकेनंतर आता ऋतुराज व हृता आगामी ‘कमांडर सक्सेना’ या सीरिजमध्ये झळकणार आहेत. नकारात्मक भूमिका असूनदेखील कार्तिकच्या माध्यमातून ऋतुराजला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद मिळाला होता. 

Tags: hruta durguleMan Udu Udu Jhalamarathi entertainmentmarathi entertainment newsruturaj phadke
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bigg Boss Ott 3

"हे लोक एकत्र कसे झोपत असतील?", अरमान मलिकला त्याच्या दोन लग्नांवरुन विचारला भलताच प्रश्न, उत्तर देत म्हणाला, "ज्याची इच्छा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.