Ankita Walavalkar And Kunal Bhagat : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर घराघरांत पोहोचली. अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री घेतली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, उत्तम खेळ खेळत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मिडीयावरही कोकणहार्टेड गर्ल अंकिताच्या नावाची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात असताना पासूनच तिच्या स्वभावानं, स्पष्टवक्तेपणाने, मनमिळाऊपणाने प्रेक्षकांची मन जिंकली. सोशल मीडियावरही अंकिताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. कोकणी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या अंकिताने अनेक रील व्हिडीओ बनवत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
‘बिग बॉस’च्या घरात असताना पासूनच तिच्या होणाऱ्या जोडीदाराची चर्चा सुरु होती. ‘बिग बॉस’बरोबरच अंकिता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही विशेष चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. अंकिताचा होणारा जोडीदार कोण आहे याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेली असताना अखेर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली. अंकिता संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसह रिलेशनशिपमध्ये आहे. अंकिताने जोडीदारासाठी खास पोस्ट शेअर करत लवकरच ते लग्न करणार असल्याची घोषणा देखील केली.
अंकिता वालावलकरचा बॉयफ्रेंड कुणाल भगत हा सिनेविश्वात सक्रिय आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसह अंकिता वालावलकरचे सूर जुळलेत. अंकिता व कुणाल ‘बिग बॉस’नंतर अनेकदा एकत्र फिरताना दिसले. सोशल मीडियावर ते एकत्र त्यांचे व्हिडीओदेखील शेअर करताना दिसतात. अशातच सध्या अंकिता व कुणाल अंकिताच्या गावी म्हणजेच मालवणला आहेत. मतदानासाठी अंकिता तिच्या घरी गेली होती. त्यानंतर कुणालही मालवणला गेला आणि त्याने अंकिताला सरप्राईज दिलं.
आणखी वाचा – लग्नाचे आमिष दाखवून शोषण, ‘पुष्पा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्यावर महिलेचे आरोप, नेमकं प्रकरण काय?
त्यांनतर कुणाल व अंकिता वालावलकरने अभिनेता अभिषेक गांवकर व रील स्टार सोनाली कुलकर्णीच्या लग्नाला मालवण येथे हजेरी लावली होती. सध्या कुणाल व अंकिता मालवणला धमाल करताना दिसत आहे. नुकताच मालवण येथील जत्रेतील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दोघेही जत्रेतील खेळांचा आनंद लुटताना दिसत आहेत. या खेळादरम्यान दोघांची लुटुपुटुची भांडणही झालेली पाहायला मिळाली. अंकिता व कुणालचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.